भाजप/मनसे (Photo Credit: Twitter/PTI)

महाराष्ट्रातील 288 विधानसभा जागांवर मतमोजणीला प्रारंभ झाला आहे. 21 ऑक्टोबर रोजी ठाणे जिल्ह्यातील 18 जागांवर मतदान झाले. ठाणे (Thane) विधानसभा मतदारसंघात सध्याचे भाजपचे  (BJP) आमदार संजय केळकर (Sanjay Kelkar) आणि मनसे (MNS) ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव (Avinash Jadhav) यांच्यात मुख्य स्पर्धा होत आहे. सध्याच्या ट्रेंडनुसार केळकर यांना 54,536 मतांनी आघाडीवर आहे, तर जाधव त्यांना चुरस देत आहे. सध्याच्या आकडेवारीनुसार जाधव यांना 47,785 मतं मिळाली आहे आणि ते केळकरांच्या 6,751‬ मतांनी पिछाडीवर आहे. या जागेवर राष्ट्रवादी मनसेला पाठिंबा देत आहे. या जागेवर निवडणूक लढवायची शिवसेनेची इच्छा होती, पण ती भाजपापर्यंत पोहोचू शकली नाही. ठाण्याच्या एकूण 18 जागांवर 213 उमेदवारांनी निवडणूक लढवली आहेत. (महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकाल : भाजपला अपेक्षेपेक्षा कमी मते मिळताच शिवसेना आक्रमक; मुख्यमंत्री पदाची केली मागणी)

दोन दिवसापूर्वी झालेल्या मतदानानंतर आता मतमोजणीला जोरदार सुरुवात झाली आहे. 12 वाजेपर्यंत कलानुसार भाजप-शिवसेनेच्या महायुतीला बहुमत मिळत असून त्यांनी 180 जागांवर आघाडी मिळवली आहे. पण, काँग्रेस-राष्ट्रवादीची महाआघाडी त्यांना कडवी झुंज देत आहे. सध्याच्या कलानुसार महाआघाडीला 89 जागांवर आघाडी मिळाली आहे. शिवाय, राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांनी भाजप-सेनेच्या नाकी आणले आहे. एकीकडे रोहित पवार याने भाजपच्या राम शिंदे यांच्यावर आघाडी कायम ठेवली आहे. तर धनंजय मुंडे यांनी चुलत बहीण पंकजाविरुद्ध विजयाच्या दिशेने वाटचाल सुरु ठेवली आहे.