BJP | Photo Credits: Archived, edited, symbolic images)

लवकरच विधानसभा निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे. महायुती, महाविकास आघाडी आणि इतर महत्त्वाचे पक्ष आतापासूनच विविध प्लॅन आखताना दिसत आहेत. भारतीय जनता पक्षाने देखील आता आगामी निवडणूकीच्या पार्श्वभूमिवर आता तयारी सुरू केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी प्रदेश भारतीय जनता पार्टीतर्फे व्यवस्थापन समिती स्थापन करण्यात आल्याची माहिती माजी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे यांनी मंगळवारी दिली. त्यांना या समितीचे अध्यक्ष करण्यात आले आहे. रावसाहेब दानवे यांनी मंगळवारी पत्रकार परिषद घेत दिली आहे. दानवे म्हणाले, बूथ पर्यंतची यंत्रणा सक्षम करण्यासाठी पक्षातर्फे ही व्यवस्थापन समिती तयार करण्यात आली आहे. (हेही वाचा  - Maharashtra Politics: अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि NCP ची स्वतंत्र बैठक पार पडणार; राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या सागर बंगल्यावर दाखल)

पाहा पोस्ट -

विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत. अनुसूचित जाती मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष दिलीप कांबळे, अनुसूचित जाती मोर्चाचे राष्ट्रीय महामंत्री अशोक नेते, आ. श्रीकांत भारतीय यांची सहसंयोजक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

विधानसभा निवडणुकीचे नियोजन, संचलन करण्यासाठी प्रदेश, जिल्हा, तालुका स्तरावर अधिवेशने झाली आहेत. विधानसभा निवडणूक व्यवस्थापन समिती अंतर्गत विविध स्तरांवर समित्या गठित करण्यात आल्या आहेत.