केंद्रीय गृहमंत्री अमित शाह दोन दिवसांच्या मुंबई दौऱ्यावर आले होते. शाह यांच्या या दौऱ्यादरम्यान महायुतीच्या नेत्यांमध्ये रात्री उशिरा महत्त्वाच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याची माहिती मिळत आहे. पण या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार नव्हते. विशेष म्हणजे अजित पवार हे मुंबईत असून अमित शाह यांच्या भेटीला गेले नाहीत. आता अ मिळत आहे. दरम्यान अमित शहा यांच्या दौऱ्यानंतर भाजप आणि NCP ची स्वतंत्र बैठक पार पडणार आहे. (हेही वाचा -  Amit Shah Visited Lalbaugcha Raja in Mumbai: अमित शहा यांनी घेतलं मुंबईतील लालबागच्या राजाचं दर्शन; पहा व्हिडिओ)

सागर बंगल्यावर अजित पवार हे राष्ट्रवादीच्या नेत्यांची बैठक घेत आहेत, अशी माहिती समोर आली आहे. अमित शहा यांच्यासोबत झालेल्या बैठकीनंतर दोन्ही पक्षांच्या बैठकीला महत्व प्राप्त झालेले आहे. अमित शहा यांनी केलेल्या सूचना या प्रत्येक पदाधिकारी, आणि कार्यकर्त्यापर्यंत पोहोचवण्यासाठीच्या सूचना या बैठकीत देण्यात येण्याची शक्यता आहे. महायुतीच्या जागा वाटपामध्ये प्रत्येकाचा सन्मान राखला जाईल याची खात्री अमित शहा यांनी महायुतीतील इतर घटक पक्षांच्या नेत्यांना दिली आहे. यामुळे आता सर्वच पक्ष संपूर्ण ताकदीने प्रचारासाठी तयार झाले आहेत.

जागा वाटपांबाबत दिल्लीत अंतीम चर्चा होण्याची दाट शक्यता असल्याने भाजप आणि NCP च्या या स्वतंत्र बैठकांमध्ये काय चर्चा होते ही बघणे महत्वाचे ठरणार आहे. अजित पवार काल बारामती दौरा संपवून मुंबईत आले होते. पण तरीही त्यांनी अमित शाह यांची भेट घेतली नाही. अखेर सर्वत्र चर्चा झाल्यानंतर अमित शाह मुंबई दौरा संपवून दिल्लीला रवाना होत असताना अजित पवार यांनी मुंबई विमानतळावर जावून शाह यांची धावती भेट घेतली.