विधानसभा निवडणूकीचा दिवस जसजसा जवळ येतोय तसतसे सर्व राजकीय पक्षांच्या सभांना देखील उधाण आल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. सर्वच पक्षांचे प्रमुख आपल्या पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी आपल्या मतदारसंघात सभा घेताना दिसत आहेत. म्हणून राज्याच्या ग्रामविकास मंत्री भाजप प्रवक्त्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसवर (NCP) निशाणा साधत येत्या 24 ऑक्टोबरला रात्री 12 वाजून 12 मिनिटांनी राष्ट्रवादीचे घड्याळ कायमचे बंद पडणार आहे असे सडेतोड वक्तव्य केले आहे. नगर मधील पांढरीपूलमध्ये झालेल्या जाहीर सभेमध्ये त्या बोलत होत्या.
नगरचे पाणी बीडला पळविणार, या अफवेचा त्यांनी समाचार घेतला. राहुरी विधानसभा मतदार संघातील भाजपचे उमेदवार शिवाजी कर्डिले, नेवासा मतदारसंघातील उमेदवार बाळासाहेब मुरकुटे, शेवगाव-पाथर्डीच्या उमेदवार मोनिका राजळे यांच्या प्रचारार्थ पांढरीपूल येथे जाहीर झाली. सभेत भाजप नेत्या पंकजा मुंडे बोलत होत्या. बीडमध्ये जाणार अशी अफवा सध्या जोरात सुरू आहे. आम्ही पाणी पळवणारे नाही तर पाणी पाजणारे आहोत. यामुळे अशा अफवांवर विश्वास ठेऊ नका, असेही त्या यावेळी म्हणाल्या. हेदेखील वाचा- अहमदनगर: भाजपवाल्यांना दारात उभे करु नका; शरद पवार यांचे शेतकऱ्यांना अवाहन
आमच्याकडे कर्डिले, मुरकुटे यांच्यासारखे टोपीवाले आमदार आहेत. यामुळे राष्ट्रवादीवाल्यांनी आता लोकांना टोपी घालण्याचे उद्योग बंद करावेत. राज्याच्या निवडणुकीत देशाच्या निवडणुकीची पुनरावृत्ती होणार आहे. राज्यात पुन्हा महायुतीची एक हाती सत्ता येणार आहे. आम्ही एक एक आमदार विजयी व्हावा यासाठी स्वत:चे मतदारसंघ सोडून राज्यभर फिरत आहोत असेही ते यावेळी बोलत होते.
राष्ट्रवादीचा सर्वात मोठा शत्रू कुणी असेल ते गोपीनाथ मुंडे आणि त्यांची अवलात म्हणजे मी, त्यामुळे या राष्ट्रवादीचे घड्याळ मी बंदच पाडणार असा विश्वास पंकजा मुंडे यांनी व्यक्त केला. जातीपातीचे राजकारण न करता समाजातील प्रत्येक घटकांना विकासाच्या प्रवाहात आणण्याचे काम स्व. गोपीनाथ मुंडे यांच्या प्रेरणेने सुरू आहे हेही त्यांनी या सभेत आर्वजून सांगितले.