अमरावती मधील मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव पसरु नये म्हणून 170 कैद्यांना 45 दिवस होम क्वारंटाइन
Home Quarantine (Photo Credit: Twitter)

देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळे येत्या 31 मे पर्यंत लॉकडाउनचे आदेश कायम राहणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी सर्वोतोपरी सरकारकडून प्रयत्न केले जात आहेत. तसेच नागरिकांना कोरोनाच्या विरोधात लढा देण्यासाठी घरातच थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याच दरम्यान विविध राज्यात असणाऱ्या तुरुंगातील कैदी, कर्मचारी आणि पोलीस कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले आहे. त्यामुळे आता अमरावती मधील जिल्हा मध्यवर्ती कारागृहात कोरोनाचा प्रादुर्भाव अधिक पसरु नये म्हणून 170 कैद्यांना 45 दिवस होम क्वारंटाइन करण्यात आले आहे. तर गृह विभागाच्या निर्देशनानुसार ही कारवाई करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे.

आतापर्यंत महाराष्ट्रातील 7200 कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आल्याचा निर्णय अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. तसेच तुरुंगातील होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीकोनातून सुद्धा याचा विचार करण्यात आला आहे. लवकरच अजून 10 हजार कैद्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात येणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा धोका आता कैद्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. तुरुंगातून सोडण्यात आलेल्या कैद्यांना तत्काळ आणि पेरॉवर सोडण्यात आले आहे. राज्य सरकारने असे म्हटले आहे की, जवळजवळ 11 हजार कैदी महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावलेल्या कैद्यांना तत्काळ सोडण्यात येणार आहे.(Coronavirus in Maharashtra: महाराष्ट्रात आज 2250 नवीन कोरोना व्हायरस रुग्णांची नोंद; एकूण संक्रमितांची संख्या 39,297 वर)

कैद्यांसदर्भात एक उच्च स्तरीय कमिटी नेमण्यात आली असून राज्य सरकारने नुकतेच राज्यातील विविध ठिकाणच्या 50 टक्के कैद्यांची मुक्तता करावी असा निर्णय घेतला होता. ती संख्या जवळजवळ 17 हजार ऐवढी असल्याची शक्यता आहे. तसेच मुंबईतील आर्थर रोड जेल मधील 100 कैद्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कारणास्तव राज्यातील विविध तुरुंगातील कैद्यांना सोडण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.