देशभरासह महाराष्ट्रात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. त्यामुळेच आता महाराष्ट्रातील 7200 कैद्यांची तुरुंगातून सुटका करण्यात आल्याचा निर्णय अधिकाऱ्यांकडून घेण्यात आला आहे. तसेच तुरुंगातील होणाऱ्या गर्दीच्या दृष्टीकोनातून सुद्धा याचा विचार करण्यात आला आहे. लवकरच अजून 10 हजार कैद्यांची तुरुंगातून मुक्तता करण्यात येणार असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे. कोरोना व्हायरसचा धोका आता कैद्यांपर्यंत येऊन पोहचला आहे. तुरुंगातून सोडण्यात आलेल्या कैद्यांना तत्काळ आणि पेरॉवर सोडण्यात आले आहे. राज्य सरकारने असे म्हटले आहे की, जवळजवळ 11 हजार कैदी महाराष्ट्रात आहेत. त्यामुळे सात वर्षांपेक्षा कमी शिक्षा ठोठावलेल्या कैद्यांना तत्काळ सोडण्यात येणार आहे.
लॉकडाउनपूर्वी राज्यातील 60 तुरुंगात एकूण35 हजार कैदी होते. त्यापैकी आतापर्यंत 7200 जणांना तुरुंगातून सोडण्यात आल्याची माहिती तुरुंग विभागाने अधिकाऱ्यांना दिली आहे. मात्र तत्काळ आणि पेरोलवर या कैद्यांना सोडण्यात आले असल्याचे ही त्यांनी स्पष्ट केले आहे. कैद्यांसदर्भात एक उच्च स्तरीय कमिटी नेमण्यात आली असून राज्य सरकारने नुकतेच राज्यातील विविध ठिकाणच्या 50 टक्के कैद्यांची मुक्तता करावी असा निर्णय घेतला होता. ती संख्या जवळजवळ 17 हजार ऐवढी असल्याची शक्यता आहे.(Lockdown Extension In Maharashtra: महाराष्ट्रात 31 मे पर्यंत लॉक डाऊन कायम!)
मुंबईतील आर्थर रोड जेल मधील 100 कैद्यांसह कर्मचाऱ्यांना कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले होते. याच कारणास्तव राज्यातील विविध तुरुंगातील कैद्यांना सोडण्यात येण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. लॉकडाउनपूर्वी आर्थर रोड जेल येथे 2300 पैकी 700 जणांना आतापर्यंत सोडण्यात आले आहे. परंतु सध्या 1572 कैदी अद्याप आर्थर रोड तुरुंगात असल्याचे ही स्पष्ट करण्यात आले आहे.