Lockdown | Representational Image | (Photo Credits: Pixabay)

Lockdown Extension In Maharashtra: महाराष्ट्रात उद्या, 18 मे पासून सुरु होणारे लॉकडाऊन (Lockdown 4.0) हे 31 मे पर्यंत कायम असणार आहे. याबाबत महाराष्ट्र सरकारने (Maharashtra Government) सूचना जारी केली आहे. Epidemic Diesease Act 1857 च्या नियमानुसार राज्यात सुरु असणाऱ्या कोरोना व्हायरस संकटकाळात खबरदारीचा पर्याय म्ह्णून हे लॉक डाऊन कायम ठेवण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आपल्या भाषणातून देशात लॉक डाऊन 4 सुरु होणार असल्याची घोषणा केली होती, मात्र हे लॉक डाऊन किती तारखेपर्यंत असेल याविषयी स्पष्टीकरण देण्यात आले नव्हते. लॉक डाऊन 3चा आजचा शेवटचा दिवस असताना ही घोषणा करण्यात आली आहे. यानुसार 31 मे पर्यंत महाराष्ट्रात लॉक डाऊनचे सर्व नियम लागू असतील. यावेळी ग्रीन आणि ऑरेंज झोन मध्ये नियम शिथिल करण्यात येतील मात्र रेड आणि कंटेनमेंट झोन मध्ये कठोर नियम पाळावे लागणार आहेत. महाराष्ट्रातील तुम्ही राहत असणारा जिल्हा कोणत्या झोन मध्ये येतो हे जाणून घ्या एका क्लिक वर

महाराष्ट्रात कालच्या दिवसभरात 1606 नवीन कोरोना व्हायरस रुग्ण आणि 67 नवीन मृतांची नोंद झाली, ज्यानुसार राज्यातील संक्रमित रुग्णांची एकूण संख्या 30,706 झाली आहे तर कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या 1135 झाली आहे. सध्या 22,479 सक्रीय रुग्ण असून, आज राज्यात 524 लोक बरे झाले असून, आतापर्यंत 7088 लोकांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तुम्ही राहत असणाऱ्या जिल्ह्यात कोरोनाचे किती रुग्ण आहेत हे जाणून घ्या .

ANI ट्विट

महाराष्ट्रात मुख्यतः मुंबई, पुणे, ठाणे, नाशिकमी औरंगाबाद हे जिल्हे कोरोनाचे हॉटस्पॉट आहेत, मुंबईत आजवर कोरोनाचे 18,555 रुग्ण असून आतापर्यंत 696 जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर पुणे आणि जवळील जिल्ह्यात एकूण कोरोनाबाधितांची संख्या ही 4149 असून आजवर 212 मृत्यू झाले आहेत.