Deputy CM Ajit Pawar (Photo Credits-ANI)

आज विधानभवनात महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात येत आहे. हा अर्थसंकल्प महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी सादर केला असून राज्यातील नागरिकांना कोणत्या सोईसुविधा या अर्थसंकल्पतून मिळणार आहेत ते कळणार आहे. तसेच अर्थराज्यमंत्री शंभुराजे देसाई हे विधानपरिषदेत अर्थसंकल्प मांडणार आहे. तर अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर करताना काही महत्वाचे निर्णय जाहीर केले आहेत. या अर्थसंकल्पातून महिलांसाठी सुद्धा काही तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार 1 हजार कोटी पर्यंतची खरेदी महिला बचत गटांच्या माध्यमातून करण्याची तरतूद सरकारकडून अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. महिला आणि तरूणींना माफक दरात सॅनिटरी नॅपकीन उपलब्ध करून दिले जाणार आहेत.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या सरकारचे हे पहिलेच अर्थसंकल्प आहे. त्यामुळे विविध योजनांबाबत कोणत्या तरतूदी करण्यात येणार याकडे सर्वांचे लक्ष लागून होतेच. तर आज अखेर विधानभवनात अजित पवार यांनी अर्थसंकल्प सादर केला आहे. त्यानुसार महिलांसाठी राज्यातील सर्व जिल्ह्यात एक पोलीस स्थानक उभारले जाणार आहे. या पोलीस स्थानकाचे नेतृत्व महिला अधिकारीच करणार एखाद्या महिलेला काही तक्रार करायची झाल्यास ती येथे करु शकणार आहे.(Maharashtra Budget 2020-21 Live Updates: राज्यात पेट्रोल डिझेलच्या किमतीत 1 रुपयाची वाढ)

ऐवढेच नाही तर तृतीयपंथींच्या हक्कांसाठी एका मंडळाची स्थापना करण्यात येणार आहे. तर सामाजिक न्याय विभागातील कामांसाठी 9668 कोटींच्या निधीची तरतूद करण्यात येणार असल्याचे अजित पवार यांनी जाहीर केले आहे. अखिल भारतीय मराठी नाट्यसंम्मेलनासाठी 10 कोटींचा निधी देण्यात येणार आहे. त्याचसोबत महाराष्ट्र राज्यात पेट्रोल डिझेल वर देण्यात येणारी सवलत ही 2500 कोटींवरून 1800 कोटींवर कमी करण्यात आली आहे. यामुळे राज्यात अतिरिक्त कर वाढून पेट्रोल डिझेलची किंमत 1 रुपयाने वाढणार आहे.