Accident | Image used for representational purpose | (Photo Credit: ANI)

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli) आष्टी-आलापल्ली मार्गावर चौडमपल्ली जवळ असलेल्या चंदनखेडी फाट्यावर पिकअप (Pickup) आणि शिवशाही बसमध्ये (Shivshahi Bus) आज जोरदार धडक (Accident) झाली आहे. या भीषण अफघातात 4 मजुरांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. या अपघातात 8 जणांची प्रकती चिंताजनक असून त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीतील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. तर, उर्वरित 5 जण किरकोळ जखमी असून त्यांच्यावर आष्टी ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात एकच खळबळ माजली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, तेंलगाणातून मिरची तोडणारे मजूर पिकअपमधून ब्रम्हपुरीकडे जात होते. तर, शिवशाही बस प्रवाश्यांना घेऊन भंडारा वरून अहेरीकडे निघाली होती. मात्र, चौडमपल्ली जवळील चंदनखेडी फाट्यावर पिकअप वाहन चालकाचे संतुलन बिघडले आणि समोरून येणाऱ्या बसला त्याने जोरदार धडक दिली. या धडकेत पिकअप वाहन चालक आणि एक मजूर जागीच ठार झाले. तर, अन्य दोघांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. हे देखील वाचा- Alliance Air: नाशिकहून हैदराबादकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब? अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला अटक

पिकअप वाहनात एकूण 17 मजूर होते. सदर शिवशाही बस अहेरी डेपोची असून बातमी लिहीत पर्यंत मृतकांची नावे कळू शकलेली नाहीत. मात्र, अपघात इतका भीषण होतं की त्यातील 8 जणाची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना चंद्रपूर आणि गडचिरोलीला रेफर करण्यात आले आहे. होळीच्या दिवशी मजुरांवर काळाने घाला घातल्याने संपूर्ण राज्यातून हळहळ व्यक्त केली जात आहे.