Charter plane | Image Use For Symbolic Purposes Only | (Photo Credits: PixaBay)

अलायन्स एअरच्या (Alliance Air) नाशिकहून हैदराबादकडे जाणाऱ्या विमानात बॉम्ब (Bomb Rumor) असल्याची अफवा पसरवणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी अटक केली आहे. शनिवारी रात्री 8.25 वाजता हे विमान महाराष्ट्र विमानतळावरून उड्डाण करणार होते. मात्र, उड्डाण करण्याच्या 20 मिनिटांपूर्वी विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची माहिती नाशिक पोलीस नियंत्रण कक्षात देण्यात आली होती. त्यानंतर विमानतळावर एकच खळबळ माजली असून सर्व प्रवाशांना विमानातून खाली उतरवण्यात आले, असे दिंडोरी पोलीस ठाण्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले आहे. ही गोष्ट नंतर अफवा असल्याचे सिद्ध झाली. संबंधित व्यक्तीला विमानात सीट न मिळाली नाही म्हणून त्याने पोलिसांना फोन केल्याचे पोलीस चौकशीतून स्पष्ट झाले आहे.

विरेश वेंन्केन्ट नारायण मूर्ती (वय, 33) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. मूर्ती हा आंध्रप्रदेशच्या काकीनाडा परिसरातील एका कंपनीत इंजिनिअर म्हणून कार्यरत आहे. त्याने हैदराबादला जाण्यासाठी विमानाचे तिकीट घेतले होते. परंतु, तो विमानतळावर पोहचल्यानंतर त्याच्या तिकीटाची पीएनआर स्थिती अद्यायावत न झाल्याने कर्मचाऱ्यांनी त्याला दुसरे तिकीट घेण्यास सांगितले. मात्र, गर्भवती पत्नीला भेटायला जायचे असल्यामुळे त्याला ताबडतोब घरी जायचे असे सांगत त्याने कर्मचाऱ्यांनी हुज्जत घालायला सुरुवात केली. हे देखील वाचा- Maharashtra Temperature Update: महाराष्ट्रात उकाडा वाढला, 30 आणि 31 मार्च दरम्यान विदर्भ व संलग्न मराठवाडा भागात तापमान वाढीची शक्यता

त्यानंतर तो विमानतळावरून निघून गेला. यावर नाराज असलेल्या मूर्तीने विमानात बॉम्ब ठेवण्यात आल्याची अफवाह पसरण्यासाठी पोलिसांना फोन केला. दरम्यान, पोलिसांनी विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज पाहिली, ज्यात आरोपी विमान कर्मचाऱ्यांशी बोलताना दिसला. पोलिसांनी फोन नंबरच्या आधारे त्याला शोधून काढले आणि नाशिक शहरातून त्याला अटक केली. तसेच त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.