Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 HD Images । | (Photo Credit: Archived, Edited And Representative images)

कोरोना व्हायरस (Coronavirus) संकट कमी झाले असले तरी ते अद्याप पूर्णपणे दूर झाले नाही. त्यातच कोरोनाचा एक नवा स्ट्रेन 'ओमायक्रॉन' (Omicron variant of Coronavirus) नवे आव्हान उभा करणार की काय अशी शक्यता वर्तवली जात आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने डॉ. बाबासाहेब आंबेडकर (Dr B.R. Ambedkar) यांच्या 65 व्या महापरिनिर्वाण (Mahaparinirvan Diwas 2021) दिनानिमित्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. महापरिनिर्वाण दिनानिमित्त (Mahaparinirvan Diwas 2021 Guidelines) डॉ. आंबेडकर यांचे अनुयायी मोठ्या प्रमाणावर मुंबई येथील चैत्यभूमी, दादर येथे येतात. पाठिमागील दोन वर्षांपासून कोरोना व्हायरस संसर्गाच्या पार्श्वभूमीवर ही गर्दी टाळण्यात येत आहे. यंदाही आंबेडकरी अनुयायांनी चैत्यभूमीवर गर्दी न करता घरुनच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे असे अवाहन राज्य सरकारने केले आहे.

राज्य सरकारने महापरिनिर्वाण दिनानिमीत्त जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना

  1. महापरिनिर्वाण दिन (6 डिसेंबर 2021 रोजी) कार्यक्रम कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आरोग्याची काळजी घेऊन आणि गर्दी न जमवता आयोजित करावयाचा आहे.
  2.  राज्य सरकारने कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ' ब्रेक द चेन' अतर्गत दिलेल्या मार्गदर्शन सूचनांचे पालन नागरिकांनी तंतोतंत करायचे आहे.
  3. कोरोनाचा नवा व्हेटीएंट 'ओमायक्रॉन' (Omicron) अधिक धोकादायक असल्याचे तज्ज्ञांचे मत आहे. त्यामुळे महापरिनिर्वाण दिन साजरा करताना गर्दी होणार नाही आणि कोरोना व्हायरस संसर्ग वाढणार नाही याची दक्षता घेणे आवश्यक आहे. (हेही वाचा, Dr Babasaheb Ambedkar Quotes: महापरिनिर्वाण दिन निमित्त बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार Facebook, WhatsApp द्वारा शेअर करत महामानवाला करा अभिवादन)
  4. चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे बाबासाहेब आंबेडकर यांना शासकीय मानवंदना देण्यासाठी विविध मान्यवर उपस्थित राहतील. मात्र, या वेळी डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करण्यासाठी उपस्थित राहणाऱ्या नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीचे दोन डोस पूर्ण झालेले असणे बंधणकारक आहे. तसेच, उपस्थितांचे थर्मल स्क्रिनिंगही करण्यात येईल. ज्यांच्या शरीराचे तापमान सामान्य असेल त्यांनाच कार्यक्रमास प्रवेश दिला जाईल आणि उपस्थित राहता येईल.
  5. कार्यक्रमाच्या ठिकाणी मास्कचा वापर सॅनिटायझरचा वापर आणि सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे, जेणेकरुन कोरोनाता संसर्ग, संक्रमण वाढणार नाही.
  6. महापरिनिर्वाण दिनी चैत्यभूमी / शिवाजी पार्क परिसरात कोणत्याही प्रकारचे खाद्यपदार्थ / पुस्तके यांचे स्टॉल लावण्यात येऊ नयेत. तसेच सदर परिसरात कोणत्याही प्रकारच्या सभा, धरणे, निदर्शने, आंदोलने आणि मोर्चे काढू नयेत.

दरम्यान, महापरिनिर्वाण दिनानिमित्त चैत्यभूमी, दादर, मुंबई येथील कार्यक्रमाचे राज्य शासनातर्फे थेट प्रक्षेपण करण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व अनुयायांनी चैत्यभूमी, दादर, मुंबई येथे प्रत्यक्ष गर्दी न करता घरुनच महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करावे, असे अवाहन राज्य सरकारद्वारे करण्यात आले आहे.