Dr. Babasaheb Ambedkar Mahaparinirvan Diwas 2019: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या 63 व्या महापरिनिर्वाण दिना (Mahaparinirvan Din) निमित्त आज (6 डिसेंबर) राज्य आणि देशभरातून भीम अनुयायी आज दादर येथील चैत्यभूमीवर बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी दाखल झाले आहे. दरम्यान लाखो सामान्य अनुयायींसोबतच आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अन्य नेते देखील शिवाजी पार्क येथील त्यांच्या स्मृतिस्थळावर आज पोहचले आहेत. तर काहींनी सोशल मीडियामध्ये ट्वीटर, फेसबूक पोस्टच्या माध्यमातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याला सलाम करत त्यांना अभिवादन केले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, राज ठाकरे, जयंत पाटील, उद्धव ठाकरे, राधाकृष्ण विखे पाटील यांसारख्या राज्यातील दिग्गज राजकारण्यांसोबतच देशातील अनेक बड्या नेत्यांनी आपली आदरांजली अर्पण केली आहे. DR BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019 Messages: 63व्या महापरिनिर्वाण दिन निमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करणारे मराठी मेसेजेस आणि WhatsApp Status.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे निधन 6 डिसेंबर 1956 साली नवी दिल्ली येथील त्यांच्या राहत्या घरी झाले. त्यांच्या निधनानंतर मुंबईमध्ये शिवाजी पार्क परिसरात त्यांच्यावर अंत्यसंस्कार झाले. बाबासाहेब आंबेडकर यांचा हा स्मृतिदिन 'महापरिनिर्वाण दिन' म्हणून ओळखला जातो. यंदा बाबासाहेबांचा 63 वा महापरिनिर्वाण दिन असून बौद्ध धर्मांची शिकवण देत भारतामध्ये सामाजिक विषमता कमी करण्यासाठी त्यांनी विशेष योगदान दिले आहे. Dr. BR Ambedkar Mahaparinirvan Din 2019: महापरिनिर्वाण म्हणजे काय? डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची पुण्यतिथी महापरिनिर्वाण दिन म्हणून का ओळखली जाते?
उद्धव ठाकरे यांचे अभिवादन
भारतीय संविधानाचे शिल्पकार, थोर समाजसुधारक, आर्थिक धोरणांचे धुरीण, आंतरराष्ट्रीय संबंधांचे जाणकार आणि भाष्यकार, युगपुरूष, #महामानव , #प्रज्ञासूर्य , भारतरत्न डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांना महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!#महापरिनिर्वाणदिन#प्रज्ञासूर्य pic.twitter.com/bi3IlsYNXc
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 6, 2019
महा विकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज चैत्यभूमीवर जाऊन बाबासाहेबांच्या स्मृतीला वंदन केले आहे.
नरेंद्र मोदी ट्वीट
सामाजिक न्याय के लिए अपना जीवन समर्पित कर देने वाले पूज्य बाबासाहेब को उनके महापरिनिर्वाण दिवस पर कोटि-कोटि नमन। उन्होंने संविधान के रूप में देश को अद्वितीय सौगात दी, जो हमारे लोकतंत्र का आधारस्तंभ है। कृतज्ञ राष्ट्र सदैव उनका ऋणी रहेगा। pic.twitter.com/3CT5BJ3fEM
— Narendra Modi (@narendramodi) December 6, 2019
राज ठाकरे ट्वीट
स्वातंत्र्य, समता, बंधुता ह्या मूल्यांची गुंफण करत भारतीय लोकशाहीला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेचं अभेद्य कवच दिलं. आज भारतीय लोकशाहीचा कसोटीचा काळ आहे, ह्या काळात बाबासाहेबांनी दिलेल्या मूल्यांसाठी आग्रही राहणं हेच बाबासाहेबांच्या स्मृतीस योग्य अभिवादन ठरेल. #महामानव pic.twitter.com/FdLAEAYQIg
— Raj Thackeray (@RajThackeray) December 6, 2019
जयंत पाटील यांचे अभिवादन
भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. #बाबासाहेबआंबेडकर यांनी जगातील सर्वात अलौकिक अशी राज्यघटना भारताला दिली. #भारतरत्न म्हणून ज्यांचा गौरव झाला त्या प्रज्ञासूर्यास महापरिनिर्वाणदिनी विनम्र अभिवादन!- श्री. जयंत पाटील, मंत्री, महाराष्ट्र राज्य @Jayant_R_Patil pic.twitter.com/XogQBq8x6y
— MAHARASHTRA DGIPR (@MahaDGIPR) December 6, 2019
राधाकृष्ण विखे पाटील
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार,भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त कोटी कोटी प्रणाम! pic.twitter.com/hMWGMYUNg1
— R Vikhe Patil (@RVikhePatil) December 6, 2019
जितेंद्र आव्हाड
रक्ताचा एकही थेंब न सांडता कामगार, महिला, वंचित, उपेक्षित, दुर्बल घटकांसाठी सामाजिक, आर्थिक, राजकीय, शैक्षणिक यांसारख्या अनेक क्षेत्रांत आमूलाग्र बदल करून त्यांचे जीवन सुखकर करणाऱ्या महामानवास विनम्र अभिवादन..#महापरिनिर्वाणदिन pic.twitter.com/aewHz561ti
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) December 6, 2019
आज 63 व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मृतीला वंदन करण्यासाठी येणार्या भीम अनुयायींची गर्दी पाहता मुंबई महानगर पालिका प्रशासन, राज्य सरकार, वाहतूक पोलिस प्रशासन आणि स्वयंसेवकांकडून खास सोय चैत्यभूमी परिसराजवळ केली आहे.