लोकसभा निवडणुकीच्या (Loksabha Election) पार्श्वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने महायुतीला साथ दिली. आज रविवारी महादेव जानकर (Mahadev Jankar) आणि महायुतीमधील प्रमुख नेत्यांमध्ये चर्चा झाली. या चर्चेदरम्यान, महादेव जानकर यांनी महायुतीसोबत राहाणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. महायुतीने रासपला एक जागा सोडणार असल्याचा निर्णय घेतल्याची माहिती समोर आली आहे. महादेव जानकर यांची आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी सविस्तर चर्चा केली. (हेही वाचा - Lok Sabha Elections 2024: विजय शिवतारे 12 एप्रिलला बारामती लोकसभा मतदारसंघातून भरणार उमेदवारी अर्ज)
पाहा पोस्ट -
Maharashtra | Mahadev Jankar, chief of RSP (Rashtriya Samaj party) joined Mahayuti in the presence of Maharashtra CM Eknath Shinde, Dy CMs Ajit Pawar and Devendra Fadnavis.
(Photo source - BJP) pic.twitter.com/NjGgiSRSWP
— ANI (@ANI) March 24, 2024
या बैठकीत महादेव जानकर यांनी आपण महायुती सोबतच राहणार असल्याचा निर्धार व्यक्त केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे देखील यावेळी उपस्थित होते. या बैठकीनंतर महादेव जानकर यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच देशाचा खऱ्या अर्थाने विकास झालाय'. तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातच भारत विकसित राष्ट्र म्हणून उदयास येईल, त्यामुळे आपण नरेंद्र मोदी यांच्यासोबत आहोत, असे जानकर यांनी यावेळी स्पष्ट केले.
बैठकीत रासप लोकसभेची एक जागा देण्याचा निर्णय सुद्धा घेण्यात आला आहे. 'महायुतीचा प्रत्येक उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण पूर्ण शक्तिनिशी सोबत राहू, असेही जानकरांनी सांगितले. या बैठकीनंतर महादेव जानकर म्हणाले, 'मी भाजपवर नाराज होतो, पण आता जागा दिली. त्यामुळे नाराज नाही. एक ते दोन दिवसात कळेल, मला कुठली जागा देणार. मी माझ्या पक्षाच्या चिन्हावर निवडणूक लढवणार आहे.