महाड येथे पुरस्थितीमुळे घराच्या छतावर मगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
Crocodile (Photo Credits: Unsplash/Representational Image)

महाराष्ट्रातील विविध भागात गेल्या दोन दिवसांपासून जोरदार पावसाला सुरुवात झाली असून जनवजीवन विस्कळीत झाले आहे. याचा परिणाम राज्यातील स्थानिक नागरिकांसह तेथील वाहतूकीवर झाला आहे. तसेच काही ठिकाणी पुरस्थिती निर्माण झाली असून अनेकांना घर सोडावी लागली आहेत. याच परिस्थित महाड (Mahad) येथे सुरु असलेल्या मुसधळार पावसामुळे पुरस्थिती निर्माण झाली आहे.

नेटवर्क 18 लोकमतने दिलेल्या वृत्तानुसार, पुरस्थितीमुळे महाड येथील अनेक घरात पाणी शिकले असून सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आह. तसेच जवळजवळ 10 फुटांपर्यंत पाणी शिरल्याने नागरिकांना याचा फटका बसला आहे. तसेच पुराच्या पाण्यामुळे प्राण्यांनाही फटका बसला आहे. तर पुरस्थितीत घराच्या छपरावर मगर दिसून आल्याने नगारिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.(ठाणे: वर्तकनगर येथील गृहसंकुलात मगर, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण)

 घराच्या छतावर मगरीने पुरस्थितीपासून बचावण्यासाठी तेथे दिसून आली. तसेच सावित्री नदीमधील काही मगरी या पुराच्या पाण्यासोबत नागरीवस्तीत शिरल्याचे सांगण्यात येत आहे. तर गेल्या दोन दिवसांपूर्वी ठाणे वर्तक नगर येथे गृहसंकुलात नाल्यातून मगर आल्याची बाब समोर आली होती. सध्या पावसामुळे मानवीजीवनासह प्राण्यांचे सुद्धा हाल होत आहेत.