मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यात बैठक सुरु, आदित्य ठाकरे, एकनाथ शिंदे, अनिल परब यांचीही उपस्थिती
Uddhav Thackeray, Ajit Pawar | (Photo Credits: Archived, edited, symbolic images)

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नेतृत्वाखाली राज्यातील मंत्र्यांची एक बैठक आज पार पडत आहे.. बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे पार पडत असलेल्या बैठकीस या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे, गृहमंत्री अनिल देशमुख, पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, शिवसेना नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde), अनिल परब (Anil Parab) उपस्थित आहेत. राज्यातील कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव, त्यावर राबविण्यात आलेल्या उपाययोजना, लॉकडाऊन आणि राज्यासमोर असलेले आर्थिक प्रश्न, उद्योगांना चालना अशा विविध विषयांवर या वेळी चर्चा सुरु असल्याचे समजते.

दरम्यान, पारनेर येथील शिवसेनेच्या पाच नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला आहे. त्यामुळे महाविकासआघाडी सरकारमधील पक्षच मित्रपक्षातून फोडाफोडी करत असल्याचे चित्र प्रसारमाध्यमांतून रंगविण्यात आले. यावर शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांकडूनही हा तितका मोठा मुद्दा नसल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान, या बैठकीत यामुद्दावरही चर्चा होणार असल्याचे वृत्त आहे. (हेही वाचा, शरद पवार यांच्याकडून पारनेर, लॉकडाऊन, कोरोना व्हायरस यांसह विविध विषयांवर भाष्य; मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही पाठराखण)

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्यात मातोश्री एथे कालच एक बैठक पार पडली. या बैठकीस गृहमंत्री अनिल देशमुख हेसुद्धा उपस्थित होते. सत्तास्थापनेनंतर मुख्यमंत्री ठाकरे आणि शरद पवार यांची मातोश्रीवर झालेली ही दुसरी भेट आहे. या भेटीत राज्याचे राजकारण आणि इतरही अनेक विषयांवर चर्चा झाल्याचे वृत्त आहे. त्यानंतर आता मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री आणि इतर मंत्र्यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडत आहे.