Govt Stays Reopening of Schools: शिक्षण विभागाचा विचार बदलला; शाळा सुरु करण्याबाबतच्या निर्णयास स्थिगती
Schools | (Image used for representational purpose only) (Photo Credits: Pixabay)

राज्याच्या शिक्षण विभागाने (School Education Department of Maharashtra) सामवारी (5 जुलै) जाहीर केलेल्या आपल्याच निर्णयावर घुमजाव करत आज (6 जुलै) तो निर्णय मागेही घेतला. राज्यात कोरोना व्हायरस (COVID-19) महामारीचे संकट आजही कायम आहे. दरम्यान, या संकटासोबत दोन हात करत काही ग्रामपंचायत आणि स्थानिक स्वराज्य संस्था गावे करोनामुक्त करण्यात यशस्वी झाल्या आहेत. दरम्यान, कोरोना मुक्त झालेल्या भागातील शाळांचे इयत्ता 8 वी ते 12 वी पर्यंतचे वर्ग प्रत्यक्षात सुरु (Reopening of Schools) करण्याबाबत शिक्षण विभागाने निर्णय जाहीर केला होता. या निर्णयाचे स्वागतही झाले होते. परंतू , लगेचच हा निर्णय आता मागे घेतल्याने शिक्षण विभाग चर्चेत आला आहे.

निर्णय मागे घेत शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे की, स्थानिक पातळीवर कोविडची स्थिती नेमकी काय आहे या बाबत अहवाल मागवला जाईल. या अहवालाचा आढावा घेऊन तसेच जिल्ह्यातील कोविड स्थिती आदींची माहिती घेऊन विचार केला जाईल. याशिवाय शाळेचे मुख्याध्यापक आणि पालक यांचीही शाळा सुरु करण्यास परवानगी आवश्यक आहे. या अहवालात तशी माहिती आहे का याबाबतही माहिती घेतली जाईल. त्या नंतर शाळा टप्प्याटप्याने सुरु करण्याबाबत निर्णय घेतला जाईल. शिवाय या सर्व तांत्रिक बाबींची दखल शासन निर्णयात घेतली जाईल, असेही शिक्षण विभागाने म्हटले आहे. (हेही वाचा, Maharashtra Board HSC Result 2021: महाराष्ट्र बोर्ड 12वीचा निकाल 23 जुलै नंतर; अंतर्गत मुल्यमापन प्रक्रियेचे वेळापत्रक जारी)

गोंधळात गोंधळ

शिक्षण विभागाने शाळा सुरु करण्याबाबत आगोदर निर्णय जाहीर केला. परंतू, लगेचच हा निर्णय जाहीर करत संकेतस्थळावरुनही हा निर्णय परस्परच हटविण्यात आला. तसेच, हा निर्णय स्थगित करुन रातोरात हटविण्यात आल्याने अशा प्रकारचा निर्णय झाल्याची पुरेशी माहिती खुद्द शिक्षणविभागातीलच काही अधिकाऱ्यांना नसल्याची माहिती पुढे येत आहे. त्यामुळे शिक्षण विभागात एकच एक गोंधळ पाहायाला मिळत असल्याचा आरोप होत आहे.