Tukaram Supe | (File Image)

महाराष्ट्र सरकारच्या आरोग्य विभाग पाठोपाठ म्हाडा परीक्षांच्या वेळेस झालेला गोंधळ पाहून प्रशासन कामाला लागल्यानंतर परीक्षांचे घोटाळे समोर आले. पुणे पोलिसांनी महाराष्ट्र राज्य परीक्षा विभागाचे अध्यक्ष आणि महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषदेचा अतिरीक्त कार्यभार असलेले तुकाराम सुपे (Tukaram Supe) आणि शिक्षण आयुक्ताचा सल्लागार अभिषेक सावरीकर (Abhishek Savrikar) या दोघांना पोलिसांनी अटक केली आहे. अटकेच्या वेळेस तुपे यांच्या घरून 88 लाख रोकड जप्त करण्यात आली होती. तर आता दुसर्‍यांदा तुपे यांच्या घरी टाकलेल्या धाडेत दोन कोटींहून अधिक रक्कम आणि सोनं जप्त करण्यात आलं आहे.

तुकाराम सुपे यांच्या घरी पोलीसांनी धाड टाकायच्या आधी त्यांची पत्नी आणि मेहुण्याने रक्कम हलवली होती. मात्र पोलिसांच्या कसून केलेल्या तपासाला यश आलं असून रक्कम आणि सोनं हस्तगत करण्यात आले आहे. म्हाडा पेपरफुटी प्रकरणाचा तपास सुरू असताना टीईटी परीक्षेमध्येही गोंधळ असल्याचे समोर आले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन जण अटकेत आहेत. ह्र देखील वाचा: TET Exam Fraud Case: शिक्षक पात्रता परीक्षेतील भ्रष्टाचाराच्या चौकशीसाठी समिती स्थापन, शिक्षणमंत्री वर्षा गायकवाडांची माहिती .

पोलिस तपासामध्ये समोर आलेल्या माहितीनुसार, शिक्षक पात्रता परीक्षा मध्ये पास होण्यासाठी उमेदवारांना ओएमआर शीट रिकामी ठेवण्याची सूचना होती. पेपर स्कॅन करून तपासताना ते भरले जात असे. कुणी नापास झाल्यास रिचेकिंगला टाकण्यास सांगितले जात होते. त्यामध्ये पास केले जात होते. अशाप्रकारे पास करण्यासाठी परीक्षार्थ्याकडून 35 हजार ते 1 लाख रूपये घेतले जात होते.

यंदा म्हाडाची परीक्षा 12 डिसेंबरला होणार होती पण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी 11 डिसेबरच्या रात्री उशिरा काही तांत्रिक कारणामुळे आयोजित परीक्षा लांबणीवर ढकलण्याची घोषणा करण्यात आली. काही महिन्यांपूर्वी असाच प्रकार आरोग्य विभागाच्या परीक्षांच्या वेळेसही झाला होता.