शिक्षक पात्रता परीक्षेतील (TET) कथित भ्रष्टाचाराच्या (Corruption) चौकशीसाठी राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शुक्रवारी अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली. कोणीही फसवणूक करून विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळण्याचा प्रयत्न करत असेल, तर ते खपवून घेतले जाणार नाही. गैरप्रकार करणाऱ्यांवर राज्य सरकार (State Government) कठोर कारवाई करेल, असे गायकवाड यांनी माध्यमांना सांगितले. टीईटीमधील भ्रष्टाचाराची सखोल चौकशी करण्यासाठी अतिरिक्त मुख्य सचिव वंदना कृष्णा यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली आहे. समितीला सविस्तर अहवाल सादर करण्यास सांगण्यात आले आहे, त्या म्हणाल्या.
याबाबत मंत्र्यांनी शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. गायकवाड यांनी समितीला शिक्षण विभागाकडून पूर्ण सहकार्य करण्याचे आश्वासनही दिले. महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे आयुक्त तुकाराम सुपे यांना पुणे पोलिसांनी TET मध्ये गैरव्यवहार केल्याप्रकरणी अटक केली होती. प्रितेश देशमुख आणि अभिषेक सावरीकर या दोन कथित साथीदारांनाही अटक करण्यात आली आहे.
टीईटी परीक्षेतील कथित गैरव्यवहार प्रकरणाबाबतच्या कायदेशीर कार्यवाहीसंदर्भात शालेय शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांशी चर्चा केली. विद्यार्थ्यांच्या भविष्याशी जर कोणी खेळ करत असेल तर तो अजिबात खपवून घेतला जाणार नाही. जो कुणी दोषी आढळेल त्यास कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल. pic.twitter.com/OaRHv29fAC
— Prof. Varsha Eknath Gaikwad (@VarshaEGaikwad) December 17, 2021
म्हाडाच्या परीक्षेच्या पेपरफुटीप्रकरणी पोलिसांनी केलेल्या तपासात ही बाब उघडकीस आली असून, त्यात सहा जणांना अटक करण्यात आली आहे. नोव्हेंबरमध्ये टीईटी परीक्षा घेण्यात आली होती. त्यासाठी दहा लाख उमेदवारांनी हजेरी लावली. 4.25 कोटी रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे आणि परीक्षा उत्तीर्ण करण्यासाठी उमेदवारांना 50,000 ते 1 लाख रुपये देण्यास सांगण्यात आले होते.