online ((Photo Credits: Pexels)

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण बोर्डाकडून दहावी (SSC), बारावीचे (HSC) परीक्षा अर्ज भरण्यास पुन्हा मुदतवाढ देण्यात आली आहे. काही दिवसांपूर्वीच बोर्डाने यंदा ऑफलाईन माध्यमातून पार पडणार्‍या 10, 12 वीच्या परीक्षांचे वेळापत्रक जारी केले आहे.परीक्षा ऑफलाईन होणार असली तरीही अर्ज ऑनलाईन माध्यमातून मागवण्यात आले होते आणि ते भरताना काही तांत्रिक अडचणी येत असल्याने अर्ज भरण्यास बोर्डाने मुदतवाढ दिली आहे.

दहावीचे पुर्नपरीक्षा, खाजगी विद्यार्थी, श्रेणी सुधार साठी परीक्षा देणारे विद्यार्थी आता नियमित शुल्कासह 26 डिसेंबर पर्यंत अर्ज करू शकणार आहेत तर विलंब शुल्क सह 1 जानेवारी 2022 पर्यंत अर्ज सादर करू शकतील. तर बारावीचे विद्यार्थी केवळ आता विलंब शुल्कासह 28 डिसेंबर संध्याकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज सादर करू शकणार आहेत. विद्यार्थ्यांना त्यांचे अर्ज बोर्डाचं अधिकृत संकेतस्थळ www.mahahsscboard.in वर सादर करायचे आहेत. इथे पहा दहावी, बारावी च्या विद्यार्थ्यांसाठीचे बोर्डाचे परिपत्रक.

कोरोनाच्या सावटाखाली यंदा बोर्ड 10,12वीच्या परीक्षा ऑफलाईन घेण्याच्या तयारीत आहे. यंदा बारावीच्या परीक्षा 4 मार्च ते 7 एप्रिलदरम्यान होतील. तर दहावीच्या परीक्षा 15 मार्च ते 18 एप्रिलदरम्यान होतील. 14 फ्रेब्रुवारी ते 3 मार्चपर्यंत बारावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. 25 फेब्रुवारी ते 14 मार्च दहावीच्या तोंडी परीक्षा होणार आहेत. असे मंडळाने जाहीर केले आहे.

मागील वर्षी कोरोनाच्या भारतात आलेल्या दुसर्‍या लाटेमुळे परीक्षा रद्द करत विद्यार्थ्यांना अंंतर्गत मूल्यमापन पद्धतीच्या निकषावरून त्यांचे निकाल देण्यात आले होते. पण यावर्षी विद्यार्थ्यांना ऑफलाईन परीक्षा देण्यासाठी बोर्ड तयारी करत आहे. यंदा सीबीएसई आणि आयसीएसई बोर्डाने दोन सत्रात बोर्डाची परीक्षा घेण्यास सुरूवात केली आहे.