फोटो सौजन्य -Delhigrapher/Twitter

बच्चे कंपनी पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी त्वरीत भूक भागवणारे विविध पदार्थ बाजारात उपलब्ध असतात. तर दोन मिनिटांत झटपट तयार होणाऱ्या मॅगीची ही यामध्ये गणना केली जाते.  मात्र मॅगीमध्ये आता अळ्या सापडल्याने ती पुन्हा वादात सापडली आहे.

पुण्यात राहणारी तरुणी दिपाली मोरे हिने बुधवारी कोथरुड येथून एका दुकानातून मॅगीचे पाकिट खरेदी केले. त्यानंतर तिने रात्री 8.30 वाजताच्या सुमारास खरेदी केलेली मॅगी तयार करण्यास सुरुवात केली. मात्र मॅगी जशी तयार होण्यास सुरुवात झाली त्यावेळी तिला त्यामध्ये अळ्या असल्याचे आढळून आले आहे. यामुळे दिप्तीने मॅगीच्या पाकिटावरील एक्सपायरी डेट पाहिली तेव्हा 2019 अशी लिहली होती. तसेच ही मॅगी 2019 पर्यंत खाण्यायोग्य असल्याचे कसे नमूद केलेले दिसल्याने मोरे यांनी संपात मॅगी कंपनीविरुद्ध संताप व्यक्त केला आहे. या घटनेने पुण्यातील पालकवर्ग ही मॅगीविरुद्ध नाराजी व्यक्त केली आहे.

तसेच दिप्तीने लगेच या मॅगीचा फोटो काढून त्याबद्दल मॅगीच्या अधिकृत कंपनीला टॅग करुन ट्विट केले आहे. या प्रकरणी मॅगी कंपनीने लवकरच यावर तोडगा काढू असं तिच्या ट्विटला उत्तर दिले आहे.