First Female MSRTC Bus Driver (PC - Twitter)

First Female MSRTC Bus Driver: आज महिला कोणत्याचं क्षेत्रात कमी नाहीय, याचं उदाहरण नुकतचं नाशिक जिल्ह्यात समोर आलं आहे. नाशिक ते सिन्नर मार्गावर महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाची (MSRTC) बस चालवणारी पहिली महिला म्हणून माधवी साळवे (Madhavi Salve) यांनी इतिहास रचला आहे. राज्याच्या सार्वजनिक वाहतुकीच्या इतिहासातील एक महत्त्वाचा टप्पा म्हणून 6-7 जून रोजी MSRTC मध्ये सहा महिलांना बस चालक-सह-कंडक्टर म्हणून समाविष्ट करण्यात आले. मूळची त्र्यंबकेश्वर तालुक्यातील महिरावणी गावातील 34 वर्षीय माधवी साळवे ही 2016 पासून हलके व्यावसायिक वाहन चालवत होती.

बस ड्रायव्हर होण्यापर्यंतचा साळवेचा प्रवास थक्क करणारा आहे. माधवीची बस चालवण्याची आवड आणि लैंगिक अडथळे तोडण्याचा तिचा निर्धार यामुळे तिच्या स्वप्नांना अधिक बळ मिळालं. काही मित्र आणि नातेवाईकांच्या संशयाचा सामना करत असतानाही तिने आपल्या कुटुंबाच्या पाठिंब्याने आपले स्वप्न पूर्ण केले. (हेही वाचा -Sant Tukaram Maharaj Palkhi Sohala 2023: आषाढी वारीच्या तुकोबारायांच्या पालखीचं पंढरीच्या दिशेने प्रवास सुरू; इथे पहा थेट सोहळा (Watch Video))

दरम्यान, 2019 मध्ये थेट भरती योजनेत तब्बल 206 महिला चालक पात्र ठरल्या होत्या आणि त्यापैकी आतापर्यंत 28 जणांची भरती करण्यात आली आहे. 2019 मध्ये त्यांची भरती प्रक्रिया सुरू झाल्यापासून, या महिलांनी MSRTC बसेसवर कठोर प्रशिक्षण आणि चाचण्या घेतल्या आहेत.

तथापी, 16,000 हून अधिक बसेसचा ताफा असलेल्या MSRTC कडे आधीच 5,500 हून अधिक महिला कंडक्टर आहेत. एकूण 12 महिला चालकांची भरती करण्यात आली आहे. त्यापैकी सिन्नर आगारात चार, पिंपळगाव आगारात तीन, पेठ आगारात दोन आणि नाशिक जिल्ह्यातील लासलगाव, पेठ आणि कळवण आगारात प्रत्येकी एक कर्मचारी सेवा देत आहे.

MSRTC ने उचललेले हे प्रगतीशील पाऊल लैंगिक समानता आणि वाहतूक क्षेत्रातील महिलांसाठी नवीन संधी उघडण्यासाठी त्यांची वचनबद्धता दर्शवते. माधवीचं हे कर्तृत्व रोजगाराची संधी शोधणाऱ्या महिलांसाठी आदर्श ठरू शकतं. माधवी अधिकृतपणे जूनमध्ये सेवेत रुजू झाली असून प्रवाश्यांना सेवा देताना दिला अतिशय आनंद होत असल्याची भावना तिने व्यक्त केली आहे.