
दुपारी 12 पर्यंत लोकसभा निवडणुकीच्या निकालाचे चित्र बऱ्यापैकी स्पष्ट झाले आहे. यामध्ये भाजप आघाडीवर असून, कॉंग्रेससाठी फारच निराशाजनक चित्र दिसत आहे. मात्र तरी इतर पक्षांशी हातमिळवणी करत भाजपला तगडे आव्हान उभे करण्याचा पर्याय कॉंग्रेसकडे आहे. राज्यात सध्या तरी भाजप-शिवसेनेची युती सत्तेत येईल असे दिसत आहे. सध्या जे उमेदवार रिंगणात उभे आहेत त्यामध्ये कलाकारांकडे जनतेचे विशेष लक्ष आहे. छत्रपती शिवाजी आणि त्यानंतर आता संभाजी या मालिकांद्वारे घर घरा पोहचलेल्या अमोल कोल्हे यांनी, निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेतून राष्ट्रवादीमध्ये प्रवेश केला होता.
राष्ट्रवादीने अमोल कोल्हे यांना यांना शिरूर मतदारसंघातून उमेदवारी दिली होती. त्यांच्यासमोर शिवसेनचे शिवाजीराव आढळराव पाटील उभे आहेत. सध्याची स्थिती पाहता अमोल कोल्हे काही हजारांनी आघाडीवर आहेत. (हेही वाचा: राजकारणाच्या रिंगणात Bollywood Stars ची प्रतिष्ठा पणाला; उर्मिलाला धक्का तर हेमा मालिनी आघाडीवर)
अमोल कोल्हे – 241208
शिवाजीराव आढळराव पाटील – 222985
दरम्यान, मतमोजणी सुरु होऊन अर्धा तास उलटल्यानंतर अमोल कोल्हे यांनी आघाडी घेतली. हे पाहून राष्ट्रवादीने पुण्यातील बालेवाडी स्टेडियमबाहेर अमोल कोल्हेंचा भावी खासदार असा उल्लेख असणारे बॅनर झळकले आहेत.