लोकसभा निवडणुकीच्या निकालाची (Lok Sabha Election Results) पहिली फेरी झाली आहे. यामध्ये देशात जवळजवळ सर्वत्र भाजप (BJP) आघाडीवर असलेला दिसत आहे. संध्याकाळ पर्यंत अशीच स्थिती राहिली तर भारतात भाजपची सत्ता येईल हे निश्चित. प्रचारादरम्यान जनतेला आकर्षित करून घेण्यासाठी दोन्ही पक्षांनी अनके सेलिब्रिटी चेहरे उभे केले होते. इतकी वर्षे चित्रपटसृष्टीमध्ये स्वतःचे स्थान निर्माण केल्यानंतर आज राजकारणात आखाड्यात याकलाकारांचे भविष्य पणाला लागले आहे. सध्या लोकसभा निवडणुकीमध्ये उर्मिला मातोंडकर, नुसरत जहा, हेमा मालिनी, जया प्रदा, शत्रुघ्न सिन्हा, किरण खेर, स्मृती इराणी हे सेलेब्ज रिंगणात उतरले होते. जाणून घ्या काय आहे सध्याची या उमेदवारांची स्थिती.
उर्मिला मातोंडकर – गोपाल शेट्टी (मुंबई उत्तर)
मुंबईमधील जनतेचा कौल लक्षात घेऊन यावेळी कॉंग्रेसने मराठमोळी लोकप्रिय अभिनेत्री उर्मिला मातोंडकर रिंगणात आणली. मात्र सध्याची स्थिती पाहता राजकारण मुरलेले गोपाळ शेट्टी यांच्यासमोर ती पिछाडीवर आहे.
उर्मिला मातोंडकर – 293084
गोपाल शेट्टी - 90047
जया प्रदा – मोहम्मद आझम (रामपूर – उत्तर प्रदेश)
तीन वेळा पक्ष बदलून शेवटी जया प्रदा भाजपमध्ये सामील झाल्या. त्यांच्यासमोर सध्या आझम खान यांचे आव्हान आहे. अनेक आरोप प्रत्यारोप केल्यानंतर सध्या हाती आलेल्या निकालानुसार आझम खान आघाडीवर आहेत.
जया प्रदा – 46730
आझम खान – 65104
हेमा मालिनी – नरेंद्र सिंघ (मथुरा उत्तर प्रदेश)
भाजपची लोकप्रिय उमेदवारांपैकी एक बॉलिवूडची ड्रीम गर्ल सध्या मथुरा येथून आघाडीवर आहे
हेमा मालिनी – 84449
नरेंद्र सिंग – 38320 (हेही वाचा: अमेठी मध्ये काँग्रेसला मोठा धक्का, केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांच्या बाजूने प्राथमिक कल)
शत्रुघ्न सिन्हा – रवी शंकर प्रसाद (पटना साहिब – बिहार)
निवडणुकीच्या तोंडावर शत्रुघ्न सिन्हा यांनी भाजप पक्षाला राम राम ठोकून कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला होता. सध्या त्यांच्यासमोर भाजपचे रविशंकर प्रसाद उभे ठाकले आहेत.
शत्रुघ्न सिन्हा – 38247
रवी शंकर प्रसाद – 74452
नुसरत जहा – शायंतन बसू (बशीरघाट – पश्चिम बंगाल)
तृणमूल कॉंग्रेसची उमेदवार नुसरत जहा भाजपच्या शायंतन बसू बसू यांना मात देत आघाडीवर आहे.
नुसरत जहा – 80046
शायंतन बसू – 35024
किरण खेर – पवन कुमार बन्सल (चंडीगड)
चंडीगड येथे भाजप आणि कॉंग्रेसमध्ये काट्याची टक्कर चालू आहे. सध्या भाजपच्या किरण खेर फक्त हजारांनी आघाडीवर आहेत.
किरण खेर – 14654
पावन कुमार बन्सल - 13140