
सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे देशात वाहत आहेत. त्यातच आता चौथ्या टप्प्यातील मतदान 29 एप्रिलला पार पडणार आहे. तत्पूर्वी दक्षिण मुंबई (South Mumbai) लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिलिंद देवरा (Milind Deora) यांना देण्यात आली आहे. तर देवरा यांनी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj THackeray) यांच्या विरोधात भाजप (BJP) पक्षाकडून जे व्हिडिओ दाखवले जातील त्याची तपासणी करावी अशी मागणी पत्राद्वारे निवडणुक आयोगाकडे केली आहे. याबद्दल एबीपी माझा यांनी वृत्त दिले आहे.
राज ठाकरे यांनी राज्यात विविध ठिकाणी सभा घेत भाजप पक्षाच्या गेल्या 5 वर्षातील कारभाराची पोलखोल केली आहे. तसेच राज ठाकरे यांचा लाव रे तो व्हिडिओची सुद्धा हवा सर्वत्र पसरली आहे. परंतु आता राज ठाकरे यांच्या विरोधात भाजप पक्ष व्हिडिओ दाखवत त्याचे प्रतिउत्तर देणार असल्याचे सांगण्यात येत आहे. तर 27 एप्रिलला प्रचार करण्यासाठी शेवटचा दिवस आहे. त्यामुळे आता भाजप कशा पद्धतीने राज ठाकरे यांना प्रतिउत्तर देणार याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे.(Video: राज ठाकरे यांनी दिले उत्तर आणि सुरु झाली शिवसेना-मनसे युतीबाबत पुन्हा एकदा चर्चा)
तर भाजप पक्ष राज ठाकरे यांच्यावर आरोप करतील ते वर्तमानपत्रात छापून आल्याने मतदारांना प्रभावित करेल असे देवरा यांनी म्हटले आहे. त्यामुळे भाजप पक्षाकडून दाखवण्यात येणारे व्हिडिओ निवडणुक आयोगाने तपासून घ्यावी असे देवरा यांनी म्हटले आहे. तर प्रचारमुदत संपल्यानंतर जे काही छापून येईल ते नियमित असावे असे सुद्धा देवरा यांनी म्हटले आहे.