स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे (Swabhimani Shetkari Sanghatana)खासदार राजू शेट्टी (Raju Shetty) आगामी लोकसभेच्या निवडणूकीसाठी सज्ज आहेत. मागील काही दिवसांपासून शेट्टी भाजपासोबत जाणार अशी चर्चा होती. मात्र खुद्द शेट्टी यांनीच या वृत्ताचे खंडन करत भाजपा सरकार खोटी आश्वासन देतं त्यांना धडा शिकवण्यासाठी आगामी लोकसभा निवडणूक एकट्याने लढू पण भाजपासोबत (BJP) जाणार नाही अशी प्रतिक्रिया राजू शेट्टी यांनी दिली आहे. महाराष्ट्रात कॉंग्रेस - एनसीपी (Congress - NCP) सोबत महाआघाडीत सहभागी होताना त्यांनी 3 जागांची मागणी केली आहे. Lok Sabha Election 2019: कॉंग्रेस पक्षाच्या दुसर्या उमेदवार यादीमध्ये महाराष्ट्रातील '5' नावं, पहा मुंबई मधून कोण लढणार निवडणूक
राजू शेट्टी यांची मागणी
Swabhimani Shetkari Sanghatana’s Raju Shetty on his 2-day ultimatum to Congress&NCP over seat-sharing: I should get at least 2 seats.When I was in BJP,we got 3 seats. In Congress,I should get at least 2 seats,if not 3. Also, I can contest elections alone, but I'll not go with BJP pic.twitter.com/Cv85Gkywy2
— ANI (@ANI) March 14, 2019
कॉंग्रेस - एनसीपीमध्ये सहभागी होताना किमान दोन जागा मिळाव्यात अशी मागणी राजू शेट्टी यांनी केली आहे. त्याकरिता राजू शेट्टींनी दोन दिवसांचे अल्टिमेटम दिले आहे. भाजपाकडून मागील निवडणूकीमध्ये 3 जागा मिळाल्या होत्या. मात्र आगामी लोकसभा निवडणूकीमध्ये कॉंग्रेसकडून किमान दोन जागांची अपेक्षा असल्याची इच्छा बोलून दाखवली आहे.यासोबतच जर महाआघाडीकडूनही अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही तर स्वबळावर लोकसभा निवडणूक 2019 चा सामना करू असेही शेट्टी म्हणाले.
सध्या राजू शेट्टी हातकंणगले मतदारसंघातून लोकसभेचे खासदार आहेत. देशभरात शेतकर्यांना योग्य हमीभाव मिळावा, कर्जातून सुटका व्हावी अशा विविध मागण्यांसाठी त्यांनी देशभर आंदोलनं केली होती. भाजपा सरकार शेतकर्यांच्या प्रश्नाबाबत निष्काळजी असल्याचं सांगत भाजपा सरकारसोबत न जाण्यावर ठाम असल्याची भूमिका मांडली आहे.