Lok Sabha Elections 2019: लोकसभा निवडणुक अवघ्या काही दिवसांवर आल्या आहेत. याच पार्श्वभुमीवर आता महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीने आगामी लोकसभा निवडणुकीचे निकाल सांगा आणि 21 लाख रुपये जिंकण्याचे ज्योतिषांना जाहीर आव्हान केले आहे.याबद्दल त्यांनी सोशल मीडियावर अधिक माहितीसुद्धा दिली आहे.
महाराष्ट्र अंनिस यांनी हे आव्हान केले असल्याचे राज्य कार्याध्यक्ष अविनाश पाटील यांनी सांगितले आहे. यासाठी आव्हान प्रक्रिया आणि प्रश्नावली सुद्धा अंधश्रद्धा निर्मूलन समितीने फेसबुकवर जाहीर केली आहे. तर चमत्कार आणि फलज्योतिष यांच्यामधील फोलपणा शास्रीय मांडणीतून अंनिसने यापूर्वी सिद्ध केला होता. फलज्योतिष व बुवाबाजी माध्यमातून सर्वसामान्य लोकांच्या अज्ञानाचा फायदा घेऊन समाजाचे आर्थिक, सामाजिक, लैंगिक शोषण होऊ नये यासाठी संघटनेकडून नेहमी प्रयत्न करण्यात आला आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: पहिल्या टप्प्यातील मतदानाचा प्रचार आज थंडावणार; महाराष्ट्रासह 91 मतदानसंघात होणार 11 एप्रिलला मतदान)
तर महाराष्ट्रात आणि देशात होणाऱ्या विविध स्तरावरील निवडणुक निकालांचे भाकित भविष्यवेते प्रत्येक वेळी या समितीकडून निवडणुकीवेळी वर्तवले जाते असे त्यांच्या पत्रकात लिहिले आहे. तसेच समितीकडून प्रश्नावलीत एकूण 25 प्रश्न असणार आहेत. त्यामध्ये लोकसभा निवडणुकांमध्ये सहभागी झालेल्या विविध पक्षांना मिळणाऱ्या जागा, निवडणून येणाऱ्या उमेदवारांच्या मतांची टक्केवारी, महत्त्वाच्या मतदार संघातील विजयी उमेदवार, सर्वात जास्त मताधिक्क्याने विजयी होणाऱ्या उमेदवाराचे नाव असे विविध प्रश्न सदर प्रश्नावलीत विचारले जाणार आहेत.