PM Narendra Modi Rally In Nanded: पाकिस्तानकडून पैसे घेणाऱ्यांशी काँग्रेस चर्चा करु इच्छिते - पंतप्रधान मोदी
PM Narendra Modi (Image: PTI/File Photo)

Lok Sabha Elections 2019:  पाकिस्तानकडून पैसे घेणाऱ्यांसोबत काँग्रेस चर्चा करु इच्छित आहे.  असे सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. बाजप उमेदवार प्रताप पाटील चिखलीकर (Prataprao Chikhalikar) यांच्या प्रचारार्थ पंतप्रधान मोदी यांनी नांदेड लोकसभा मतदारसंघात सभा घेतली. या वेळी नांदेड येथून जाहीर सभेत ते बोलत होते. काँग्रेस जाहीरनामा म्हणजे ढकोसलापत्र आहे, असेही मोदी या वेळी म्हणाले.

नरेंद्र मोदी नांदेड सभा महत्त्वाचे मुद्दे

  • काँग्रेसची स्थिती बुडालेल्या टायटॅनिक जहाजासारखी - मोदी
  • शरद पवार, राजीव सातव, प्रफुल्ल पटेल यांनी मैदान सोडलं - नरेंद्र मोद
  • काँग्रेस आणि काँग्रेसच्या मित्रपक्षांना भाजपची भीती - नरेंद्र मोदी
  • भ्रष्टाचार करणारी आणि भ्रष्टाचाराचे पालन करणारा पक्ष म्हणजे काँग्रेस - नरेंद्र मोदी
  • काँग्रेसच्या घोषणापत्रात मध्यमर्गाबद्दल शब्दही नाही. असा जाहीरनामा आणिपक्षाला जनता स्वीकारणार नाही - नाही नरेंद्र मोदी
  • रेरा सारख्या योजनेमुळे 'आदर्श' सारख्या घोटाळ्याला चाप बसला - नरेंद्र मोदी
  • भाजपने शेतकऱ्यांना MSP दिला - नरेंद्र मोदी
  • अडचणीत आली की काँग्रेस खोटी अश्वासने देते - नरेंद्र मोदी
  • काँग्रेस व्होट बँकेसाठी काम करते - नरेंद्र मोदी

नांदेड हा काँग्रेसचा बालेकिल्ला आहे. गेली अऩेक वर्षे काँग्रेसचा उमेदवार या मतदारसंघातून निवडूण येत आहे. 2014 मध्ये आलेल्या काँग्रेस विरोधी लाटेमध्ये अवघ्या देशाने भाजपच्या पारड्यात दान टाकले. या लाटेतही नांदेड येथून काँग्रेसचा बालेकिल्ला मजबूत राहिला. माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे विद्यमान उमेदवार अशोक चव्हाण या मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत. 2014 च्या काँग्रेस विरोधी लाटेतही अशोक चव्हाण येथून निवडणूक विजयी झाले होते. त्यामुळे भाजपने या मतदारसंघातून विजय मिळविण्यासाठी अधिक बळ लावले आहे.

अशोक चव्हाण यांच्या विरोधात भाजपने प्रताप पाटील चिखलीकर यांना रिंगणात उतरवले आहे. सुरुवातीच्या काळात अशोक चव्हाण हे लोकसभा निवडणुकीसाठी फारसे इच्छुक नव्हते. मात्र, पक्षादेश आल्यावर अशोक चव्हाण पुन्हा एकदा मैदानत उतरले आहेत.

काँग्रेसच्या या बालेकिल्ल्याला सुरुंग लावण्याचा भाजपचा विचार आहे. म्हणूनच भाजपने पंतप्रधान मोदींची सभा नांदेड येथे आयोजित केल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे.