Lok Sabha Elections 2019: राज ठाकरे यांचा दुसऱ्या टप्प्यातील प्रचारसभेचा कार्यक्रम जाहीर
Raj Thackeray | MNS | File Photo | (Photo Credits- Facebook @Sachin Maruti More)

Lok Sabha Elections 2019: महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यंदा लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे त्यांनी जाहीर केले होते. तर सध्या राज ठाकरे भाजप (BJP) विरोधात महाराष्ट्रात विविध ठिकाणी प्रचारसभा घेत आहेत. आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानापूर्वी (Secound Phase Elections) राज ठाकरे महाराष्ट्रात चार ठिकाणी प्रचारसभा घेणार असल्याचे त्यांनी जाहीर केले आहे. त्यामध्ये दुसऱ्या टप्प्यातील राज ठाकरे यांच्या सभा मुंबईत (Mumbai) होणार असून दोन सभा पनवेल (Panvel) आणि नाशिक (Nashik) येथे होणार आहेत.

तर आज राज ठाकरे यांची सभा मुंबई येथील अभ्युदयनगर-काळाचौकी येथील शहीद भगतसिंग मैदानावर होणार आहे. तर बुधवारी (24 एप्रिल) भांडुप येथे होणार आहे. तर तिसरी सभा कामोठे,चौथी सभा नाशिक येथे घेणार आहेत.(हेही वाचा-Lok Sabha Elections: राज ठाकरे यांना मुंबई मध्ये सभा घेण्यास परवानगी; 23 एप्रिलला काळाचौकी मधून धडाडणार तोफ)

राज ठाकरे यांच्या प्रचारसभा कार्यक्रम:

23 एप्रिल: काळाचौकी, मुंबई

24 एप्रिल: मुंबई भांडुप (पश्चिम)

25 एप्रिल: पनवेल

26 एप्रिल: नाशिक

सध्या मोदी आणि अमित शहा यांच्यावर राज ठाकरे यांच्याकडून जोरदार टीका केली जात आहे. तसेच लाव रे तो व्हिडिओ म्हणत राज  ठाकरे त्यांच्या जाहीर सभेतून नरेंद्र मोदी यांनी केलेल्या कामांची आणि आश्वासनांची पोल खोलत आहेत. तर मनसे निवडणुक लढवणार नाही. मात्र राज ठाकरे यांच्या सभेचा फायदा राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षाला होईल अशी अपेक्षा बाळगली जात आहे.