शिर्डी येथील 174 मतदान केंद्रावर निवडणुक आयोग करडी नजर ठेवणार, लाईव्ह वेबकास्टिंगची यंत्रणा सुसज्ज
EVM (FILE PHOTO)

शिर्डी (Shirdi) येथे 29 एप्रिलला मतदाना पार पडणार आहे. तत्पूर्वी येथील एकूण 174 मतदान केंद्रावर निवडणुक आयोगाची (Election Commission) करडी नजर राहणार असून लाईव्ह वेबकास्टिंगचा (Live Webcasting) यंत्रणा सुसज्ज करण्यात आली आहे. तर मतदानाचा परिसर संपूर्णपणे इलेक्ट्रॉनिक देखरेखेखाली असणार आहे.

चौथ्या टप्प्यातील शिर्डी येथील मतदानावेळी निवडणुक आयोगाचे अधिकारी मतदान केंद्रावर लक्ष ठेवून असणार असून तेथील प्रत्येक हालचालींची माहिती त्यांना दिसणार आहे. त्यामुळे आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे यासाठी लाईव्ह वेबकास्टिंगची यंत्रणा बसवण्यात आली आहे.(शिर्डी लोकसभा मतदारसंघ: शिवसेना खासदार सदाशिव लोखंडे पुन्हा विजयी होणार की काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे बाजी मारणार?)

तर शिर्डी मतदारसंघामध्ये एकूण 28 उमेदवार रिंगणात आहेत. त्याचसोबत शिर्डीतून शिवसेनेने विद्यमान खासदार सदाशिव लोखंडे (Sadashiv Lokhande) यांना तिकीट दिले आहे. तर, त्यांच्या विरोधात काँग्रेस पक्षाचे भाऊसाहेब कांबळे (Bhausaheb Kamble) रिंगणात आहेत. तर, बहुजन वंजित आघाडी (VBA) अरुण साबळे (Arun Sabne) यांच्या रुपात निवडणूक लढवत आहे.