Lok Sabha Elections 2019: मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या सभेमुळे निवडणुक आयोगाची (Election Commission) पंचायत झाली आहे. तसेच निवडणुकीच्या काळात आचारसंहिता लागू झाल्यानंतर उमेदवाराच्या नावावर सभांचा खर्च दाखवला जातो. मात्र राज ठाकरे यांची सभा कोणत्याही उमेदवाराच्या प्रचारासाठी नसल्यास निवडणुक आयोग कोणत्याही पद्धतीने हस्तक्षेप करु शकत नाही. असे माजी निवडणुक आयोग आयुक्त नीला सत्यनारायण (Neela Satyanarayana) यांनी म्हटले आहे.
भाजप पक्षाकडून राज ठाकरे राज्यात घेत असलेल्या सभांसाठीच्या खर्चाची चौकशी करा अशी मागणी करण्यात येत आहे. मात्र नेमक्या कोणत्या मुद्द्यावर तक्रार करायची आहे हे भाजपने ठरवले पाहिजे असे नीला यांनी म्हटले आहे. राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणुक लढवणार नसल्याचे जाहीर केले होते. परंतु त्यावेळी मोदीमुक्त भारत असा नारा लगावत त्यांनी राज्यात विविध ठिकाणी सभेचे आयोजन केले आहे. तसेच सत्तेत असलेल्या सरकार विरोधात प्रचार करणार असल्याची भुमिका राज ठाकरे यांनी घेतली आहे.(हेही वाचा-Lok Sabha Elections 2019: राज ठाकरे पहिल्या टप्प्यासाठी साताऱ्यासह अन्य 6 ठिकाणी 14 एप्रिल पासून घेणार प्रचारसभा)
त्यामुळे राजकीय धोरणांसाठी घेण्यात येणाऱ्या सभेसाठीचा खर्च पक्ष एकमेकांत वाटून घेऊ शकतात. तसेच निवडणुक न लढवणारी व्यक्ती, पक्ष स्थानिक प्रशासनाच्या परवानगीने सभा घेऊ शकतात असे सु्द्धा नीला सत्यनारायण यांनी म्हटले आहे.