बारामती: निवडणूक जिंकायची असेल तर मूळावर घाव करा; शरद पवार यांच्या बालेकिल्ल्यात अमित शहा यांचा हल्लाबोल
File image of BJP chief Amit Shah | (Photo Credit: IANS)

भाजपाचे  राष्ट्रीय  अध्यक्ष  अमित (Amit Shah)  शहा  यांनी आज बारामतीमध्ये (Baramati) सभा घेत शरद  पवार (Sharad Pawar)  आणि कॉंग्रेस पक्षावर टीका केली आहे. निवडणूक  जिंकायची असेल तर मूळावर घाव  करायला हवा असं अमित शहा म्हणाले आहेत. बारामतीमध्ये  शरद  पवार यांची लेक सुप्रिया सुळे (Supriya Sule) विरुद्ध भाजपाने कांचन कूल (kanchan Kul) यांना उमेद्वारी दिली आहे. त्यांच्या समनार्थ आज अमित  शहा बारामतीमध्ये आले होते. शरद  पवारांच्या कार्यकाळात महाराष्ट्राचा काय विकास झाला? याचा लेखाजोखा द्या असं  शहा यांनी आव्हान दिलं आहे. 50 वर्षाहून अधिक काळ राजकारणात राहण्याची कला केवळ पवारांना अवगत असल्याचं म्हटलं आहे.

लोकसभा निवडणूक 2019 मध्ये महादेव जानकरही भाजपासोबत असल्याचा आपल्याला फायदा होणार आहे असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.शहां नी  भाषणाची सुरूवात ‘जय भवानी जय शिवाजी’च्या नार्‍याने केली. त्यानंतर दहशतवाद्याच्या मुद्द्यावर बोलताना समोरून गोळी आली तर त्याचं उत्तर गोळ्यानेच दिलं जाईल असं ठणकावून सांगताना कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने एअर स्ट्राईकवर संशय व्यक्त केल्याबद्दल निषेध केला.

अमित शहा यांचं संपूर्ण भाषण

राहुल बाबा गरिबी हटाव म्हणून किती काळ लोकांना मूर्ख बनवत असल्याचं मत व्यक्त केलं. गरीबी तेच हटवू शकतात ज्यांनी गरीबी अनुभवली आहे. घाव घालायचा तर मुळावर घाला. महाराष्ट्राचे भले होईल असं म्हणत भाजपाला मतदान करण्याचं आवाहन केलं आहे.