Lok Sabha Election 2019: काही दिवसांपूर्वी बॉलिवूडची धकधक गर्ल माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) भाजपकडून (BJP) निवडणूकीच्या रिंगणात उतरणार असल्याची चर्चा होती. माधुरी भाजप पक्षाकडून पुण्यातून लोकसभा निवडणूक (Loksabha Election) लढवणार असल्याचं वृत्त समोर आलं होतं. मात्र माधुरीच्या प्रवक्त्यांनी या वृत्ताचं खंडन केलं आहे. हे वृत्त चुकीचं असल्याचं स्पष्टीकरण माधुरीच्या प्रवक्त्यांनी दिलं आहे. माधुरी दीक्षित भाजपच्या तिकिटावर पुण्यातून मैदानात? निष्ठावंतांचे काय होणार?
काही महिन्यांपूर्वी भाजपाध्यक्ष अमित शाह (Amit Shah) यांनी 'संपर्कासाठी समर्थन' या मोहिमेअंतर्गत माधुरी दीक्षितची भेट घेतली होती. त्यावेळी देखील माधुरीला राज्यसभेची ऑफर देण्यात आल्याची चर्चा रंगली होती. त्यानंतर आता पुण्यातून माधुरी दीक्षित निवडणूक लढवणार असल्याचे वृत्त समोर आले. मात्र ते चुकीचे आणि निराधार असल्याचे काही दिवसातच स्पष्ट झाले.
(Photo Credit: ANI)
सध्या माधुरी दीक्षित 'कलंक' आणि 'टोटल धमाल' या सिनेमांच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.