उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ 2019 निवडणूक निकाल: ओमराजे निंबाळकर विरूद्ध राणा जगजितसिंग यांच्यामध्ये कांटे की टक्कर
Lok Sabha Elections voting | (Only representative image)

लोकसभा निवडणूक 2019 (Lok Sabha Elections)साठी झालेल्या मतदानाची मतमोजणी सुरु झाली असून, निकालही हाती येण्यास सुरुवात झाली आहे. महाराष्ट्रातील एकूण 48 लोकसभा मतदारसंघांपैकी एक असलेल्या उस्मानाबाद लोकसभा मतदारसंघ आणि या मतदारसघातील उमेदवारांचे मताधिक्यही हाती येत आहे. शिवसेनेच्या ओमराजे निंबाळकरआणि राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या राणा जगजिंतसिंग यांच्यामध्ये या मतदारसंघात चुरशीची लढत पहायला मिळाली आहे.

महाराष्ट्रात दुसर्‍या टप्प्यातील मतदानामध्ये उस्मानाबादमध्ये मतदान पार पडले आहे. शिवसेनेने खासदार रवींद्र गायकवाड यांचे तिकीट कापुन ओमराजे निंबाळकर यांना तिकीट दिले आहे. त्यामुळे यंदा या मतदारसंघात कोण बाजी मारणार हे पाहणं उत्सुकतेचं ठरलं आहे.

11 एप्रिल ते 19 मे दरम्यान सात टप्प्यात लोकसभा निवडणूक मतदान पार पडले. यंदाचे एक्झिट पोल एनडीएच्या बाजुने आहेत. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या मतमोजणीकडे उमेदवारांसोबतच मतदारांचे लक्ष लागले आहे.