Lockdown or Strict Restrictions in Maharashtra: महाराष्ट्रात लॉकडाऊन की कडक निर्बंध? राज्य मंत्रिमंडळ बैठकीत आज फैसला
Lockdown in Maharashtra (File Photo)

वाढता कोरोना व्हायरस (Coronavirus) प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी महाराष्ट्र सरकार जोरदार प्रयत्न करत आहे. असे असले तरी राज्यातील स्थिती अधिकच गंभीर होताना दिसत आहे. त्यामुळे राज्यात आता पुन्हा एकदा लॉकडाऊन ( Lockdown in Maharashtra) लावायचा की कठोर निर्बंध (Strict Restrictions in Maharashtra,) यावर खल सुरु आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या उपस्थितीत आज राज्य मंत्रिमंडळाची एक बैठक पार पडत आहे. या बैठकीत निश्चीत निर्णय होण्याची शक्यता आहे.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील विविध क्षेत्रांतील प्रतिनिधींची एक तातडीने बैठक शनिवारी (3 मार्च) घेतली. या बैठकीत कोरोना नियंत्रणासाठी काय काय उपाययोजना करता येतील याची सविवस्तर माहिती मुख्यमंत्र्यांनी घेतली. या बैठकी नंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडत आहे. त्यामुळे या बैठकीस अधिक महत्त्व प्राप्त झाले आहे. (हेही वाचा, Coronavirus Cases In Maharashtra: महाराष्ट्रात कोरोना विषाणूचा उद्रेक; राज्यातील कोरोना संसर्ग कसा कमी होणार? तज्ज्ञांनी सांगितले 'हे' 10 उपाय)

राज्यातील कोरोना व्हायरस संकटाचा प्रादुर्भाव अधिक मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. प्रामुख्याने पुणे, मुंबई, नागपूर, ठाणे, नाशिक, औरंगाबाद, दिल्ली, अहमदनगर आणि नांदेड हे नऊ जिल्हे सर्वाधिक कोरोना प्रभावीत जिल्ह्यांपैकी आहेत. त्यामुळे राज्यात आता अधिक गांभीर्याने पावले टाकण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे. अशा स्थितीत मार्ग काढण्यासाठी पुन्हा लॉकडाऊन लागू करावा का? या विचारात राज्य सरकार आहे.

दरम्यान, राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील जनतेशी शुक्रवारी (2 मार्च) संवाद साधला. या संवादावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी लॉकडाऊन लावण्याची घोषणा केली नाही. परंतू, गरज पडल्यास लॉकडाऊन लागू शकतो असा स्पष्ट इशारा मात्र दिला. त्यामुळे आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत काय निर्णयहोतो याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

जनतेशी साधलेल्या संवाधात उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते की, आज मी लॉकडाऊनची घोषणा करणार नाही. परंतू, लॉकडाऊनचा इशारा देतो आहे. राज्यातील नागरिकांनी सहकार्य करावे. मास्क वापरावा, सार्वजनिक किंवा खासगी ठिकाणी गर्दी टाळावी. कोरोना प्रादुर्भाव वाढणार नाही यासाठी स्वत:हून जबाबादीरने वर्तन करावे. अशा प्रकारचे सहकार्य केल्यास लॉकडाऊनची आवश्यकता भासणार नाही. परंतू, जर योग्य सहकार्य होत नाही असे आढळल्यास राज्यात लॉकडाऊन लावल्याशिवाय पर्याय नाही असेही उद्धव ठाकरे यांनी म्हटले होते.