देशात कोरोना विषाणूची (Coronavirus) लागण झालेल्या सर्वाधिक प्रकरणांमध्ये महाराष्ट्र (Maharashtra) आघाडीवर आहे. त्यात सरकार समोरची आव्हाने दिवसेंदिवस वाढतच आहेत. राज्यभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन (Lockdown) सुरू आहे, परंतु आता एक नवीन समस्या उद्भवली आहे. या कोरोना व्हायरस संकटकाळात कैद्यांना सुरक्षित ठेवणे हे सरकार समोरील एक आव्हान ठरले आहे. राज्यातील बऱ्याच कारागृहांमध्ये (Jail) त्यांच्या वास्तविक क्षमतेपेक्षा जास्त कैदी भरलेले आहेत. अशा परिस्थितीत परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन सरकारने तुरूंगातही लॉक डाउन सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ही माहिती दिली.
Similar decision has been taken for 5 more jails in Maharashtra: Maharashtra Home Minister Anil Deshmukh https://t.co/76aJ8bN8n6
— ANI (@ANI) April 19, 2020
आज, रविवारी अनिल देशमुख म्हणाले, ‘महाराष्ट्रातील तुरूंगात त्यांच्या वास्तविक क्षमतेपेक्षा जास्त कैदी आहेत. त्यामुळे औरंगाबाद कारागृहात लॉक डाऊन लागू करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. कारागृहात पोलिस कर्मचार्यांच्या भोजन व राहण्याची व्यवस्था केली जाईल. कोणालाही बाहेर जाऊ दिले जाणार नाही किंवा आत जाण्याची परवानगी नसेल.’ राज्यात फक्त औरंगाबाद कारागृहातच नव्हे, तर इतर 5, म्हणजे एकूण 6 तुरूंगात लॉकडाऊन राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
(हेही वाचा: लातूरकरांना मोठा दिलासा; 8 कोरोनाबाधित रुग्णांची दोन्ही चाचण्या निगेटिव्ह)
राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख हे काल रात्री, कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर औरंगाबाद शहर आणि परिसराचा आढावा घेण्यासाठी काल रात्री तिथे पोहचले. यावेळी संचारबंदीची कडक अंमलबजावणी केली जाईल, कोणी सामाजिक तेढ निर्माण करत असेल तर त्यांच्यावर सक्त कारवाई करण्यात येईल असे गृहमंत्री अनिल देशमुख म्हणाले. यावेळी स्थानिकांनी काही प्रश्न मांडले, त्यामध्ये शिक्षणासाठी असलेल्या आणि अडकून पडलेल्या मुलांना घरी जाण्याची व्यवस्था करावी हा एक मुद्दा होता. त्यावर देशमुख यांनी हे सध्या तरी शक्य नसल्याचे सांगितले.
दरम्यान, औरंगाबादमध्ये 29 कोरोनाबाधित रुग्ण आहेत व शहरात आतापर्यंत 1300 कोरोना विषाणू चाचण्या करण्यात आल्या आहेत. तसेच 1000 जणांचे स्क्रिनिंग करण्यात आले आहे.