Closed shops in Mumbai | File Image | (Photo Credits: IANS)

महाराष्ट्रात कोविड-19 चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न सुरु आहेत. महाराष्ट्रात सद्य स्थितीत कोरोना बाधितांची एकूण संख्या 12,974 पोहोचली असून मुंबईत 9123 रुग्ण आढळले आहेत. ही संख्या लक्षात घेता मुंबईत सोशल डिस्टंसिंगसाठी मुंबई पोलिसांनी नवी घोषणा केली आहे. ज्यामध्ये उद्यापासून मुंबईतील स्टँडअलोन दुकानदारांना ग्राहकांना टोकन द्यावे लागणार आहे. दुकानांबाहेरील गर्दी टाळण्यासाठी मुंबई पोलिसांनी हा नवा नियम लागू केला आहे. यामुळे दुकानांबाहेर होणारी गर्दी टाळता येईल, असेही सांगण्यात येत आहे.

मुंबईत (Mumbai) आज कोरोनामुळे आज 18 जणांचा मृत्यू झाला आहे. तर, एकूण 510 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. यामुळे कोरोना बाधीतांची संख्या 9 हजार 123 वर पोहचली आहे. यापैंकी 1 हजार 908 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर एकूण 361 जणांचा मृत्यू झाला आहे. Mumbai Coronavirus Update: मुंबईत कोरोना विषाणूचा हाहाकार; गेल्या 24 तासात 510 नव्या रुग्णांची नोंद तर, 18 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात 12,974 कोरोना बाधित रुग्ण आढळले असून 548 रुग्ण दगावल्याची माहिती मिळत आहेत. तर 2115 रुग्ण बरे झाल्याचे सांगण्यात येत आहे.

देशात रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन हा आकडा आता 42,836 वर जाऊन पोहोचला आहे. यातील 11,762 रुग्ण बरे झाले असून 1389 रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली आहे. यात गेल्या 24 तासांत देशात 2573 नवे रुग्ण आढळले असून 83 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.