कोरोना व्हायरस (Coronavirus) संकटाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेला लॉकडाऊन (Lockdown) अधिक यशस्वी करण्यासाठी आणि नागरिकांना कोरोनाच्या संक्रमनापासून दूर ठेवण्यासाठी महाराष्ट्र पोलीस मेहनत घेत आहेत. अशा वेळी कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासोबतच नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंग पाळावे याचीही जबाबदारी पोलिसांवरच आहे. त्यामुळे पोलीसही कायद्याची कडक अंमलबजावणी करत आहे. दरम्यान, ही अंमलबजावणी करताना कायदा आणि नियमांचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी लॉकडाऊन काळात 1,33,730 गुन्हे दाखल, 27,446 जणांना अटक, 83,970 वाहने जप्त केली आहेत.
गृहमंत्री अनिल देशमुख यांनी ट्विटरद्वारे दिलेल्या माहितीत म्हटले आहे की, लॉकाऊन लागू काळात कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या नागरिकांविरुद्ध भा. दं. सं. कलम 188 अंतर्ग 1,33,730 गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यात 27,446 जणांना अटक व 83,970 वाहने जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच 8,41,32,461 रुपये इतका दंडही गुन्हेगारांकडून वसूल करण्यात आल्याची माहिती गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली आहे. (हेही वाचा, Dhananjay Munde Beats COVID 19: धनंजय मुंडे यांची कोरोनावर मात; ब्रीच कॅंडी रुग्णालयातुन डिस्चार्ज)
लॉकडाउन लागू झाल्यापासून आयपीसीच्या कलम १८८ अंतर्गत तब्बल १,३३,७३० गुन्हे नोंदविण्यात आले आहेत. यांत २७,४४६ जण अटक झालेत व ८३,९७० वाहने जप्त झाली आहेत.
₹ ८,४१,३२,४६१ इतका दंड
गुन्हेगारांकडून वसूल केला गेला आहे.
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) June 22, 2020
दरम्यान, लॉडाऊन असूनही राज्यातील कोरोना व्हायरस संक्रमित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढताना दिसत आहे. केवळ महाराष्ट्रच नव्हे तर देशभरातील कोरोना संक्रमितांची संख्याही वाढते आहे. अशात लॉकडाऊन शिथल करण्याचा निर्णय केंद्र आणि राज्य सरकारांनी घेतला आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांच्या संख्यत वाढ होण्यची शक्यता वर्तवली जात आहे.