Maharashtra: नाशिकच्या निवासी भागात दिसला बिबट्या; पहा सीसीटीव्ही व्हिडिओ
नाशिकच्या निवासी भागात बिबट्या दिसला (Photo Credits: ANI)

Maharashtra: नाशिकमध्ये (Nashik) बिबट्या (Leopard) दिसल्याच्या आणि कुत्र्यांना पकडल्याच्या बातम्या वारंवार ऐकायला मिळत आहेत. काही दिवसांपूर्वी बिबट्या घराबाहेरील कुत्र्यावर हल्ला करून त्याला घेऊन जाताना दिसला होता. ही संपूर्ण घटना घराबाहेर लावलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली. असाचं एक प्रकार नाशिकच्या निवासी भागातून समोर आला असून तेथे बिबट्या फिरत असल्याचे दिसून आले आहे. ही घटना तेथे बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाली.

वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी (Forest Department Officer) सांगितले की, पहाटे 1 वाजण्याच्या सुमारास बिबट्या अंबाद पीएस (Ambad PS) जवळ दिसला. एक मोटारसायकल चालक रस्त्यावरून जात असताना त्याला बिबट्या रस्ता ओलांडत असताना दिसला. त्यामुळे त्याने जोरात ब्रेक दाबले. या घटनेमुळे मोटारसायकल चालक खाली पडला. त्यानंतर बिबट्या जंगलात गेला, आता रहिवासी क्षेत्र सुरक्षित आहे, असं वन अधिकाऱ्याने सांगितलं आहे. (वाचा -Frogs Marriage in Tripura: बेडूक नवरा, बेडकीन बायको; त्रिपुरामध्ये बेडकांचे लग्न (Watch Video))

ही घटना बुधवार 5 मे रोजीची आहे. त्याआधीही नाशिकमध्ये बिबट्या फिरण्याच्या घटनेची बातमी समोर आली होती. नाशिकच्या निवासी भागात बिबट्या आढळण्याच्या घटना नवीन नाहीत. बिबट्याच्या दहशतीच्या घटना येथे बर्‍याचदा ऐकल्या जातात.