Leopard spotted at Woodland Crest Marol caught by Forest Department (Photo Credits: File Photo)

मुंबईतील अंधेरी (Andheri) भागातील मरोळ (Marol) परिसरातील विजय नगर जवळील वूडलँड क्रेस्ट (Woodland Crest) सोसायटीत शिरलेल्या बिबट्याला जेरबंद करण्यात वन विभागाच्या अधिकाऱ्यांना यश आले आहे. आज सकाळी वूडलँड सोसायटी बिबट्या शिरल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते. त्यानंतर लगेचच वनविभागाच्या अधिकाऱ्यांना पाचारण करण्यात आले. सुमारे साडेचार तास चाललेल्या रेक्यू ऑपरेशननंतर या बिबट्या जेरबंद करण्यात आले आहे.

सुमारे चाडेचार तास हा बिबट्या सोसायटीच्या बेसमेंटमध्ये बसला होता. त्यामुळे सोसायटीतील लोकही घराबाहेर पडण्यास धजावत नव्हते. अखेर साडेतीन-चार तासांनंतर बेशुद्ध करून त्याला पकडण्यात आले. मुंबई: मरोळ येथील Woodland Crest सोसायटीत बिबट्या शिरल्याने खळबळ 

व्हिडिओ:

वन विभागातील अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, हा बिबट्या नर असून 2 वर्षांचा होता. आता त्याला संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये सोडण्यात येईल.