Leopard Attack: महाराष्ट्रातील कोल्हापूर जिल्ह्यात राहणाऱ्या एका परिवारातील आठ जणांवर बिबट्याने हल्ला केल्याचा प्रकार समोर आला आहे. परंतु या प्रकरणी घरातील सर्व मंडळी सुदैवाने बचावली असून त्यांना कोणताही दुखापत किंवा जखमा झालेल्या नाहीत. ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली आहे. लंबोर यांच्या घरातील पाळीव कुत्र्यावर प्रथम त्याने हल्ला करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर घरातील मंडळींनी स्वत:ला सुखरुप घराच्या बाहेर काढत त्याला आतमध्ये बंद केले.
लंबोर यांच्या घरातील मंडळी जेवण करण्यासाठी बसले होते. त्यानंतर त्यांची मुलगी ही त्यांच्या कुत्र्याला खायला देण्यासाठी बाहेर गेली. ती मुख्य दरवाजा बंद करणार तितक्याच त्याच्यावर बिबट्या हल्ला करण्याचा प्रयत्न करण्याआधी तो आतमध्ये आल्याचे चांदगड वनाधिकाऱ्यांनी टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या माहितीत सांगितले. बिबट्या जेव्हा घरात शिरला तेव्हा लंबोर यांची पत्नी, एक मुलगा, तीन मुली आणि दोन नातवंडे होती.(Leopard Attack: गोरेगाव येथील परिसरात 20 वर्षीय तरुणावर बिबट्याच्या हल्ला, जखमी झाल्याने कुपर रुग्णालयात दाखल)
बिबट्याने प्रथम बेडवर झोपलेल्या मुलावर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि नंतर कुत्र्याकडे वळला. लंबोर यांना काही कळेनासे झाले होते आणि तो बिबट्या किचनच्या येथे जाऊन थांबला होता. याचाच फायदा घेत घरातील मंडळींनी त्याच्यापासुन स्वत:चा बचाव करत घराबाहेर पडले आणि त्याला आतमध्ये बंद केले. त्यानंतर शेजाऱ्यांकडे जात त्यांनी वनविभागाला याची माहिती दिली.
वनविभागाची टीम घटनास्थळी हजर झाली. काळोखाचा बिबट्या फायदा घेईल इतक्याच वनविभागाने त्याला जेरबंद केले. या घटनेत लंबोर परिवारातील एकही जण जखमी झालेला नाही. बिबट्याला सुद्धा सुखरुपपणे जंगलात सोडण्यात आले.