राज्यभर पडलेल्या परतीच्या पावसाचा फटका मुंबईकरांना बसणार आहे. या पावसामुळे पालेभाज्यांच्या उत्पादनावर परिणाम झाला आहे. त्यामुळे पालेभाज्यांच्या आवक घटल्याने त्याचे बाजारभाव वाढू लागले आहेत. लोकमत ने दिलेल्या वृत्तानुसार, यात पालेभाज्यांचे दर गगनाला भिडले असून त्याची झळ आता मुंबईकरांना बसणार आहे. यात कोथिंबीरची जुडी 25 ते 30 रुपयांवर गेली आहे.मुंबई, नवी मुंबई परिसरासाठी रोज 6 ते 7 लाख पालेभाज्यांच्या जुड्यांची गरज असते. मात्र सद्य स्थितीमध्ये सरासरी साडेचार ते पाच लाख जुडयांचीच आवक होऊ लागली आहे.याचा सरळ सरळ परिणाम हा बाजारभावावर झाला आहे.
होलसेल मार्केटमध्ये आठवडयापूर्वी कोथिंबीरची जुडी 20 ते 30 रुपयांना विकली जात होती. त्यामध्ये वाढ होऊन 25 ते 55 रुपयांवर गेली आहे. शेपू, मेथी आणि अन्य पालेभाज्यांच्या दरातही वाढ झाली आहे. महागाई दर कमी होऊनही पुन्हा एकदा मुंबई ठरले देशातील, तर हाँगकाँग जगातील सर्वात महागडे शहर
मुंबईमध्ये नाशिक, पुणे, सातारा परिसरातून भाजीपाला विक्रीसाठी येत आहे. राज्यभर पडलेल्या पावसामुळे पिकांचे नुकसान झाले असून, त्याचा परिणाम बाजारभावावर झाला आहे.
सध्याचे पालेभाज्यांचे भाव:
1. कोथिंबीर- 25 ते 55 रुपये जुडी
2. मेथी- 20 ते 40 रुपये
3. पालक- 10 ते 25 रुपये
पावसाने सध्या तरी विश्रांती घेतली असली जर आणखी काही दिवस पाऊस पडला तर त्याचा परिणाम भाज्यांवर होऊन भाज्यांचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे.