File image of the RBI | (Photo Credits: PTI)

केंद्र सरकारने खासगी क्षेत्रातील लक्ष्मी विलास बँकेला (Laxmi Vilas Bank) RBI ने दणका देत त्यांच्या कामकाजावर निर्बंध घातले आहेत. तर अवाजवी कर्जवाटप, अनियमिततेने आर्थिक संकटात अडकलेल्या या बँकेवर पुढील 30 दिवस निर्बंध कायम असणार असल्याचे ही आरबीआयने स्पष्ट केले आहे. अर्थ मंत्रालयाने या प्रकरणी लक्ष्मी विलास बँकेला 16 डिसेंबर पर्यंत Moratorium अंतर्गत ठेवण्यात आले आहे. त्यामुळे याचा खातेधारकांना सुद्धा फटका बसला आहे. खातेधारकांना बँकेच्या खात्यामधून आता एका महिन्याला फक्त 25 हजार रुपयेच काढता येणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे.(Maharashtra: राज्यातील वीज ग्राहकांना झटका! वाढीव बिलातून दिलासा मिळणार नसल्याचे उर्जामंत्री नितीन राऊत यांचे स्पष्टीकरण)

लक्ष्मी विलास बँकेवर आज संध्याकाळी 6 वाजल्यापासून हे निर्बंध लागू करण्यात आले आहेत. या बँकेला गेल्या तीन वर्षात अधिक तोटा झाला असून बुडीत कर्जात ही प्रचंड वाढ झाली आहे. बँकेचे कामकाज पूर्णपणे फोल ठरल्यानेच आरबीआयकडून ही कारवाई केली गेली आहे. त्याचसोबत बँकेच्या संचालक मंडळ आरबीआयकडून बरखास्त करत त्याजागी प्रशासकाची नियुक्ती केली गेली आहे. गेल्या काही महिन्यात या बँकेतून मोठ्या प्रमाणात पैशांची उलाढाल झाल्याचे आरबीआयने म्हटले आहे. त्याचसोबत लक्ष्मी विलास बँकेची आर्थिक स्थिती ढासळली गेली आहे.(Robbery In Kalyan: कल्याण पूर्वेत भरदिवसा ज्वेलर्सच्या दुकानात दरोडा; 30 तोळे सोन्यासह दीड लाखांची रोकड लंपास)

 Tweet: 

 Tweet: 

दरम्यान, लक्ष्मी विलास बँकेच्या खातेधारकांनी चिंता करु नये असे आवाहन करण्यात आले आहे. तर आरबीआयकडून खातेधारकांच्या हितासाठी बँकेच्या सक्षमीकरणाचा विचार केला जाणार असल्याचे ही सांगण्यात आले आहे. खातेधारकांचे पैसे सुरक्षित असून दुसऱ्या बँकेत त्याचे विलीनिकरण करण्याचा विचार आरबीआयकडून केला जात असल्याचे ही आरबीआयने म्हटले आहे.