Gunaratna Sadavarte | (File Image)

ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांच्या निवासस्थानी झालेल्या सिल्व्हर ओक (Silver Oak) हल्ल्याप्रकरणी वकील गुणरत्न सदावर्ते (Advocate Gunaratna Sadavarte) यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी (Judicial custody) सुनावण्यात आली आहे. मुंबईतील गिरगाव न्यायालयाने सदावर्ते यांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली. ते 4 दिवस पोलीस कोठडीत होते. त्याचवेळी याच प्रकरणात वकील गुणरत्न सदावर्ते यांना 17 एप्रिल पर्यंत कोठडीत ठेवण्याची मुभा न्यायालयाने सातारा पोलिसांना दिली आहे. सदावर्ते यांना उद्या सातारा पोलिस ताब्यात घेणार आहेत. आजही सरकारी वकील अॅड प्रदीप घरत यांनी जोरदार युक्तिवाद करत सदावर्तेंच्या पोलिस कोठडीची मागणी केली होती.

मात्र सदावर्ते यांच्या वकील मृण्मयी कुलकर्णी यांनी अॅड घरत यांचे आरोप फेटाळून लावत सदावर्ते यांना पोलिस कोठडी का देऊ नये, असा युक्तिवाद केला. पोलिसांच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करत वकील मृण्मयी कुलकर्णी यांनी पोलिसांवर सूड उगवल्याचा आरोप केला. हेही वाचा Jitendra Awhad On Raj Thackeray: देशात महत्त्वाचे मुद्दे असतानाही राज ठाकरे धार्मिक द्वेषाला खतपाणी घालत आहेत, राज्यमंत्री जितेंद्र आव्हाडांची घणाघाती टीका

तसेच सदावर्ते यांना पोलीस कोठडीत का ठेवायचे याचे कोणतेही कारण व पुरावे पोलिसांना देता आले नाहीत. पोलीस सदावर्ते यांच्याशी सूडबुद्धीने वागतात, असे त्या म्हणाल्या. न्यायालयाने दोन्ही पक्षांचा युक्तिवाद ऐकून घेतल्यानंतर गुणरत्न सदावर्ते यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. न्यायमूर्ती एनएम पटेल यांच्या खंडपीठाने हा आदेश दिला.