Sonu Sood | (Photo Credits: Facebook)

लातूर (Latur) मध्ये एक वयोवृद्ध शेतकरी जोडपं आर्थिक चणचण असल्याने शेतात राबतानाचा व्हिडिओ वायरल झाला आहे. बैल घेण्यासाठी पैसे नसल्याने वृद्ध आजोबा नांगर फिरवत असल्याचं पहायला मिळालं आहे. सोशल मीडीयात वायरल झालेल्या या व्हिडिओची चर्चा विधिमंडळापासून अगदी राज्यात अनेक घरांमध्ये झाली. दरम्यान राज्याच्या कृषीमंत्र्यांनी या जोडप्याची दखल घेतली आहे. तसेच बॉलिवूड कलाकार सोनू सूदने देखील वृद्ध जोडप्याला मदतीचा हात पुढे केला आहे. सोनू ने सोशल मीडीयात व्हिडिओ पोस्ट करत ' तुमचा नंबर द्या आम्ही बैल देतो.' असं म्हटलं आहे.

शेतीसाठी बैल किंवा अन्य यंत्र नसल्याने आजी आजोबा वय झालेलं असतानाही थकलेल्या अवस्थेमध्ये राबताना दिसत आहेत. हा हृद्यस्पर्शी व्हिडिओ पाहून अनेकांचे मन भारावले. लातूरचे तालुका कृषी अधिकारी सचिन बावगे यांनी वृद्ध अंबादास पवार यांची शेतात भेट घेतली. त्यांची कोरडवाहू जमीन असून, शेतीसाठी आवश्यक यंत्रसामग्री नाही याची माहिती त्यांनी घेतली. कृषी विभागाकडून त्यांना सबसिडीवर उपकरणे व ट्रॅक्टर देण्याचं आश्वासन देण्यात आलं आहे.अंबादास पवार यांच्याकडे कृषी ओळखपत्र नसल्याने त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. लवकरच त्यांना 1.25 लाख रुपयांपर्यंत अनुदान आणि शेतीसाठी आवश्यक साधनं उपलब्ध करून दिली जातील असं कृषी विभागाने सांगितलं आहे.

सोनू सूदचा मदतीचा हात

कृषी विभागाकडून मदत

मीडीया रिपोर्ट्स नुसार, या जोडप्याने सांगितले की त्यांचा मुलगा शहरात रोजंदारीवर काम करतो आणि जेव्हा त्याला वेळ मिळेल तेव्हा तो घरी पैसे पाठवतो. त्यांची सून आणि दोन नातू त्यांच्यासोबत राहतात आणि घरच्या जबाबदाऱ्या पूर्ण करण्यास मदत करतात. त्यांची विवाहित मुलगी तिच्या सासरच्यांसोबत राहते. तरीही, शेतीची बहुतेक कामे  नांगरणीपासून ते कापणीपर्यंत अंबादास आणि मुक्ताबाई स्वतः करतात.