Lalbaghcha Raja| PC: Twitter

मुंबई मधील प्रसिद्ध सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांपैकी एक लालबागचा राजा (Lalbaugcha Raja) यंदा विराजमान होणार आहे पण भाविकांना त्याच्या मंडपात त्याच्या दर्शनाची सोय नसेल. कोरोनाच्या संकटामुळे भाविकांना या वर्षी देखील ऑनलाईन दर्शनाची सोय करण्यात आली आहे. पण बाप्पाचा प्रसाद तुम्हांला घरपोच मिळावा याकरिता लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून (Lalbaugcha Raja Sarvajanik Ganeshshotsav Mandal) सोय करण्यात आली आहे. मुंबई, पुण्यामध्ये बाप्पाचा प्रसाद मोफत घरपोच दिला जाणार आहे. यासाठी ऑनलाईन बुकिंग स्वीकरली जाणार आहे. जिओ मार्टच्या माध्यमातून हा प्रसाद पोहचवला जाणार आहे.

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाकडून नुकत्याच देण्यात आलेल्या माहितीनुसार, प्रसादामध्ये 2 लाडू दिले जाणार आहेत. प्रसाद वितरणाची माहिती मंडळाच्या अधिकृत वेबसाईट http://lalbaugcharaja.com वर उपलब्ध आहे. तसेच साईट वर QR कोड स्कॅन करून देखील नागरिकांना आपली ऑर्डर बूक करता येणार आहे. Ganeshotsav 2021: लालबागचा राजा ते पुण्याचा दगडूशेठ गणपती, यंदा कोविड 19 संकटाच्या पार्श्वभूमीवर घरबसल्या कुठे घेऊ शकाल बाप्पाचं दर्शन; इथे पहा!

लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ ट्वीट

दरम्यान काल बीग बींकडून एक जुना व्हिडिओ शेअर करत पहिलं दर्शन असं ट्वीट करण्यात आलं होतं. त्यामुळे नेटकर्‍यांमध्ये काही काळ गोंधळ झाला होता पण नंतर तो जूना व्हिडीओ असल्याचं सांगण्यात आले आहे. यंदा राज्य सरकारच्या नियमावलीनुसार, लालबागचा राजा अवघ्या 4 फूट मूर्तीमध्ये विराजमान होणार आहे. यंदा मोठ्या मूर्तीप्रमाणे छोट्या मूर्तीकरिता देखील खास दागिने घडवण्यात आले आहेत.