Credit -FB/ File Photo

Ladki Bahin Yojana: मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेसाठी अपात्र असूनही लाभार्थ्यांच्या यादीत स्थान मिळविण्यात यशस्वी आलेल्या महिलांची चौकशी होणार आहे. अपात्र महिलांची यादी वगळण्यासाठी लवकरच या यादीची छाननी सुरू करण्यात येईल, अशी घोषणा महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी केली. 'लाडकी बहिण योजने'च्या बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारींवर कारवाई करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून त्यांच्या पडताळणीसाठी प्राप्तिकर विभाग आणि परिवहन विभागाकडून माहिती मागविली आहे. बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारींचा निर्णय सरकार करेल, असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या 'लाडकी बहिण' योजनेंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये मासिक भत्ता दिला जातो.

बोगस लाभार्थ्यांच्या तक्रारींचा निर्णय सरकार करेल,असे राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी गुरुवारी स्पष्ट केले. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील मागील सरकारने गेल्या वर्षी ऑगस्टमध्ये सुरू केलेल्या 'लाडकी बहिण' योजनेंतर्गत पात्र महिलांना १५०० रुपये मासिक भत्ता दिला जातो. 

लाडकी बहिण योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यासाठी महाराष्ट्र सरकार कोणतीही मोहीम राबवत नाही. आम्ही सरकारचे कोणतेही धोरण बदललेले नाही. आम्ही केवळ स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयात दाखल झालेल्या तक्रारींचे निराकरण करीत आहोत,' असे सांगून या योजनेच्या लाभार्थ्यांबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले.