
महाराष्ट्र विधानसभा निवडणूकीला लक्ष्य ठेवत महायुतीने राज्यात 'मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजगा' ही नवी योजना आणली. या योजनेअंतर्गत महाराष्ट्रामध्ये 2.5 लाखापेक्षा कमी उत्पन्न असणार्या महिलांना सरकार कडून दरमहा 1500 रूपये दिले जातात. एप्रिल महिना सरून 2 दिवस झाले तरीही अद्याप या लाभार्थ्यांना एप्रिल महिन्याचे पैसे मिळालेले नाहीत. अक्षय्य तृतीया आणि महाराष्ट्र दिनाच्या मुहूर्तावर बहिणींना हे पैसे मिळतील अशी अपेक्षा होती पण अजूनही लाभार्थ्यांच्या अकाऊंट मध्ये पैसे आलेले नाहीत. मंत्री अदिती यांनी X वर पोस्ट करत 'पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये पैसे जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही प्रक्रिया पूर्ण होईल आणि सर्व पात्र लाभार्थींना निधी थेट त्यांच्या खात्यात प्राप्त होईल.' असं म्हटलं आहे.
लाडक्या बहिणींचा एप्रिल महिन्याचा हफ्ता देण्यास सुरूवात
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” योजना
“मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण” या महत्वाकांक्षी योजनेअंतर्गत एप्रिल महिन्याचा सन्मान निधी पात्र लाभार्थी लाडक्या बहिणींच्या आधार लिंक असलेल्या बँक खात्यांमध्ये जमा करण्याची प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात येत आहे.पुढील २ ते ३ दिवसांत ही… pic.twitter.com/K8I5wo6Asq
— Aditi S Tatkare (@iAditiTatkare) May 2, 2025
राज्याच्या महिला व बालविकास विभागाकडून आतापर्यंत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपयांचे 9 हप्ते देण्यात आले आहेत. महिला व बालविकास खात्याच्या मंत्री आदिती तटकरे यांच्या माहितीनुसार, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे लाभार्थी 2 कोटी 47 लाख आहेत. त्यांना एप्रिल महिन्याचा हप्ता दिला जाणार आहे.
अर्थमंत्री अजित पवार यांनी आज कोल्हापूर मध्ये बोलताना, लाडकी बहीण योजनेचे पैसे वेळेवर देण्यासाठी आयोजन केले आहे. वेळच्या वेळी पैसे कसे दिले जातील याची काळजी घेऊ असं आश्वासन त्यांनी दिलं आहे.