मध्य रेल्वे महिला डबा ( फोटो सौजन्य - ट्विटर )
मध्य रेल्वेच्या नेहमीच्या वेळापत्रकानुसार रेल्वे बहुदा उशिराने धावत असतात. त्यामुळे प्रवासी कंटाळून जाऊन ते मध्य रेल्वेवर आपला संताप नेहमीच व्यक्त करताना दिसून येतात. मात्र आता मध्य रेल्वेने त्याच्या डब्याचे चित्रच पालटले आहे.
मध्य रेल्वेने पाचवा महिला डबा इमयू कोच नंबर 2077A या डब्याचे चित्र बदलून त्यामध्ये रंगरंगोटी केली आहे. तसेच या डब्यांना गुलाबी रंग देण्यात आला असून त्यावर पक्षी आणि झाडांचे सुंदर असे चित्र काढले आहे. मात्र या बदलावामुळे महिला प्रवाशांना दिवसभरातील गोष्टींमधून थोडा वेळ आराम आणि अल्हादायी वाटण्यासाठी हा बदलाव केल्याचे दिसून येत आहे. तसेच गुलाबी रंग हा खूप महिलांना आवडतो त्यामुळे या रेल्वेच्या डब्यांना गुलाबी रंग देण्यात आला असावा.
तर मध्य रेल्वेने कायापलाट केलेल्या महिलांच्या डब्याचे सर्वजण कौतूक करत आहेत. तर या रेल्वेच्या डब्यासाठी पर्यावरण ही थीम ठेवण्यात आली आहे. त्यामध्ये उत्तम पद्धतीचे इंटिरियर करण्यात आले आहे. तर नेटकऱ्यांनी आपल्या या डब्याच्या बाबतीत प्रतिक्रिया देऊन आनंद व्यक्त केला आहे.