Krishnabai Narayan Surve | (File Image)

कवी नारायण सुर्वे यांच्या पत्नी कृष्णाबाई यांचे निधन (Krishnabai Narayan Surve Passes Away) झाले आहे. त्या 92 वर्षांच्या होत्या. नेरळ येथे पाहाटे 4 वाजता त्यांनी अखेरचा श्वास घेतला. सकाळी 11 वाजता त्यांची अंत्ययात्रा नेरळ येथून निघणार आहे. कवी नारायण सुर्वे (Narayan Surve) यांना कामगार, दलित आणि साहित्यविश्वात मास्तर नावाने ओळखले जात होते. तर कृष्णाबाई (Krishnabai Narayan Surve) यांना 'मास्तरांची सावली' म्हणून ओळखले जात असे.

कृष्णाबाई सुर्वे यांचे मुळ नाव कृष्णाबाई तळेकर असे होते. त्यांचा जन्म मुंबई येथील गिरणगाव येथे झाला. नारायण सुर्वे हे स्वत: अनाथ होते. गंगाराम सुर्वे या गिरणी कामगाराने त्यांना आपल्या घरी आणले आणि त्यांचे संगोपन केले. त्याच प्रमाणे कृष्णाबाई सुर्वे यांच्याही वडीलांचे निधन त्या सव्वा वर्षांच्या असताना झाले होते. अल्पावधितच त्यांच्या आईनेही अत्महत्या केली. त्यानंतर कृष्णाबाई यांचा सांभाळ त्यांच्या आजीने मंगलदास चाळीमध्ये केला.

लहानपणापासून कृष्णाबाई प्रचंड कष्टाळू होत्या. आईवडील नसल्याने त्यांचे बालपण गरिबीतच गेले. बालवयातही कृष्णाबाई यांनी हालाकिच्या परिस्थितीतही आठव्या वर्षापासूनच कामधंदा करायला सुरुवात केली. कधी धुणीभांडी, कधी मजूरी करुन त्यांनी आपल्या आजीला हातभार लावला. नारायण सुर्वे यांच्यासोबत विवाह झाल्यानंतर त्या त्यांची सावली बणून राहिल्या.