Konkan Weather Forecast For Tomorrow: कोकणात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज
Image Credit: Pixabay

Konkan Weather Prediction, July 5: हवामान खात्याने आज कोकण विभागाला यलो अलर्ट जारी केला होता. हवामान खात्याच्या अंदाज नुसार आज कोकण घाटावर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यात आहे. पावसाचा जोर महाराष्ट्रात पुन्हा कमी झाल्याचे दिसून येत आहे, ज्यामुळे बळीराजा खूप चिंतेत आहे. जुलै महिन्याची सुरवात झाली आहे तरीही अपेक्षित पावसाला सुरुवात झाली नाही. मात्र कोकणात नक्कीच इतर ठिकाणापेक्षा जास्त पाऊस झाला आहे. गेल्या काही दिवसांत कोकणातही पावसाचा जोर हळू हळू कमी होत असल्याचे पाहायला मिळते आहे. आता उद्या कोकणात हवामान कसे असेल यासाठी हवामान विभागाने अंदाज वर्तवला आहे. हेही वाचा: Pune Weather Forecast For Tomorrow: पुण्यात उद्याचे हवामान कसे? जाणून घ्या हवामान अंदाज.

कोकणात उद्याचे हवामान कसे? 

 

हवामान विभागाने संपूर्ण कोकणाला काही ठिकाणी जोरदार पावसाचा येलो अलर्ट दिला गेला आहे. आजपासून पुढील काही दिवस कोकणात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. रत्नागिरी, सिंधुदुर्ग, रायगड जिल्ह्यांना येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे.

हवामान विभागाच्या अंदाजपत्रानुसार यंदा देशात सरासरीच्या 106 टक्के पावसाची शक्यता असल्याचा अंदाज आहे. तसेच महाराष्ट्रातील बहुतांशी भागात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता अधिक असल्याचेही हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 'एल निनो' स्थिती सुरुवातीच्या टप्प्यामध्ये तटस्थ राहू शकते. तर पावसाळ्याच्या दुसऱ्या टप्प्यात म्हणजेच जुलै किंवा ऑगस्टमध्ये 'ला निना' स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. ला निना स्थिती देशातील यंदाच्या मॉन्सून साठी  पोषक असल्याच्या नोंदी आहेत, असे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे.